संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारीसपुरा रहिवासी इशरत जावेद युनूस जावेद हे कुटुंबासह लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी घराला कुलूपबंद करून कुटुंबासह भुसावळ येथे गेले असता अज्ञात चोरट्याने कुलूपबंद घरात घरमंडळी नसल्याचे संधी साधून घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील आलमारीत ठेवलेले 10 ग्राम सोने,20 ग्राम सोन्याचे नेकलेस, कानातील इअरिंग सेट, नगदी 1 लक्ष 20 हजार रुपये असा एकूण 2 लक्ष 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 3 ते 5 एप्रिल दरम्यान घडली असून यासंदर्भात पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.