आनंद नगर येथे 22 हजार 800 रुपयांची घरफोडी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आनंद नगर येथे एका कुलुपबंद घरातून घरी कुणी नसल्याचे संधी साधून अज्ञात चोरट्याने कुलूप बंद घराचे कुलूप तोडून घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील आलमारीत सुरक्षित ठेवलेले नगदी 12 हजार रुपये व 10 हजार 800 रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने असा एकूण 22 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज सकाळी साडे सात दरम्यान निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी दीपमाला लांजेवार वय 36 वर्षे रा आनंद नगर कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी महिला ह्या आनंद नगर येथील रहिवासी असून परिवारासह 21 जून ला बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने संधी साधून घरात चोरी केल्याची माहिती मिळताच दुसऱ्याच दिवशी स्वगृही परत आले असता चोरी झाल्याचे निष्पन्न झाले यावरून पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासनात वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचे परीक्षण सुद्धा होणे आवश्यक - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Sun Jul 23 , 2023
नागपूर :- शासनामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचे चुकीचे निर्णय लोकांना त्रास देतात .त्यामुळे वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचे परीक्षण सुद्धा होणे आवश्यक आहे . पारदर्शकता, संवेदनशीलता, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, वेळ मर्यादित निर्णय प्रक्रिया या गोष्टी युवकांनी आपल्या शासकीय सेवेमध्ये लक्षात ठेवाव्यात असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. रोजगार मेळाव्यात सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये भरती केलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com