संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथील भारत टाऊन परिसरातील एका कुलुपबंद घरातुन अज्ञात चोरट्याने अवैधरीत्या प्रवेश करून घरातून नगदी 20 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 1 लक्ष 47 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी कैलास उज्जैनवार वय 63 वर्षे रा प्लॉट नं 152/ए भारत टाऊन येरखेडा कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 454,457,380 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी हे आपल्या परिवारासह आपल्या जुन्या घरी आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त काल 1 मे ला दुपारी गेले असता अज्ञात चोरट्याने घरी कुणी नसल्याचे संधी साधुन घराचे मुख्य प्रवेश दाराचे कुलूप तोडून घरातील सुरक्षित ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व नगदी 20 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष 47 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला.फिर्यादी घरी परतले असता घरात मुद्देमाल मिळुन आला नसून चोरी झाल्याचे निदर्शनास येताच पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.