घरफोडीचा गुन्हा उघडकीस

नागपूर :- पोलीस ठाणे पारडी हदीत प्लॉ. क. १९३, जय अंबेनगर, भांडेवाडी, पारडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी गौतम लिखीराम वर्मा, वय ५५ वर्ष, हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह कळमणा मार्केट येथे भाजीपाला खरेदी करणे करीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून, बेडरूम मधील लोखंडी आलमारीतील ड्रावरमध्ये ठेवलेले रोख १,७३,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागीने, व घर खरेदीची मुळ रजीस्ट्री असा एकुण किंमती २,८७,९००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पारडी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ५ ने अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना मिळालेले खात्रीशीर माहितीवरून त्यांनी मेकोसाबाग मैदानासमोर गेले असता त्यांना पाहुन एका संशयीत ईसम पळुन जात असतांना दिसुन आला त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद फैय्याज वल्द ईजाज अंसारी वय २२ वर्ष रा. गंगाबाग पारडी, नागपूर असे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे जवळुन पिवळया व पांढऱ्या धातुचे दागिने व दोन मोवाईल मिळुन आले. त्यास त्याबाबत विचारपूस केली असता, त्याने पोलीस ठाणे पारडी हद्दीत त्याचा साथिदार नामे गुरूप्रसाद उर्फ लक्की सिताराम सनोडीया वय २२ वर्ष रा. शिवनगर झोपडपट्टी, भांडेवाडी, नागपूर वाचेसह संगणमत करून वर नमुद घरफोडी केल्याने कबुली देवुन त्या गुन्हयातील हा मुद्देमाल असल्याचे सांगीतले. दोन्ही आरोपीस ताब्यातुन घेवुन त्यांचे जवळुन सोन्या-चांदीचे दागिने, ०२ मोबाईल फोन असा एकुण १,६४,९००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई करीता पारडी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन),अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. राहुल शिरे, पोहवा. राजुसिंग राठोड, राजेन्द्र राकळीकर, रूपेश नानवरकर, नापोअं. प्रविण भगत, प्रमोद बावणे, गणेश ठाकरे, पोअं. दिपक बावणकर, देवचंद थोटे, रोशन तांदुळकर, आशिष पवार व योगेश महाजन यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अपघात करणारा आरोपी ताब्यात

Sat Jan 11 , 2025
नागपूर :- फिर्यादीची आई नामे मंदा अभिमन्यू पत्रे वय ६८ वर्ष रा. दिघोरी नाका, रामकृष्ण नगर, उमरेड रोड, नागपूर हया सामान आणण्याकरीता दिघोरी, टेलिफोन नगर चौक, ओम रेस्टॉरन्ट समोरून पायदळ जात्त असता १० चाकी टिप्पर गाडी क. एम.एच ३५ ए.जे ३७०९ चा चालक नामे नितेश भालचंद्र शेंडे वय ३४ वर्ष रा. गोपीवाड़ा, शाहपुर, जि. भंडारा याने त्याचे ताब्यातील टिप्पर ट्रक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!