संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- आनंद नगर तारसा रोड येथील राहत्या घरी कुणी नसल्याची संधी साधुन घराचे गेट व दरवाज्याचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून आलमारीतील सोन्या, चांदीचे दागिने व नगदी वीस हजार असा एकुण तीस हजार एकशे नव्वद रूपयाचा मुद्देमाल चोरी करून अज्ञात चोर पसार झाले.
संघरक्षक भिमराव नंदेश्वर वय २८ वर्षे रा. आनंद नगर तारसा रोड कन्हान ता. पारशिवनी हे पत्नी प्रियंका नंदेश्वर व एक मुलगी दर्शनी वय ४ वर्षे असे मिळुन राहतात. त्यांच्या पत्नीची प्रकृती बरी नसल्याने ते ०७ दिवसापुर्वी पत्नी व मुलीला घेवुन कामठी येथे सासरी गेले होते. तेव्हा पासुन तेथेच राहत असुन अधा मधात आपले घरी येत असायचे बुधवार (दि.१७) जुलै ला सकाळी १०.१५ वाजता दरम्यान कामठी येथे असताना घराजवळ राहणारा चुलत भाऊ किष्णा विश्वनाथ मुळे याने फोनवर म्हटले की, भाऊ तु घरी आला होता का ? तुझ्या घराचा बाहेरील लाईट सुरु आहे व घराचे दार आतुन लावलेले आहे. नाही म्हणुन लगेच पत्नी व मुलीला घेवुन आपल्या घरी कन्हान ला आले असता बाहेरील लाईट सुरू असुन घराचे समोरील दाराला कूलुप नसुन दार आतुन लागलेले असल्याने घराचे मागे जावुन पाहिले तर मागचे दार खुले असल्याने आत गेले असता घरातील लोखंडी आलमारीतील सामान व कपडे आलमीचे बाहेर अस्तव्यस्त पडलेले होते. तेव्हा लक्षात आले की, घरी चोरी झालेली आहे. म्हणुन पोलीस स्टेशनला फोन कारुन माहिती देऊन बोलाविले आणि आलमारीची पाहणी केली तर आलमारीत ठेवलेले जुने कानातील सोन्याचे ताराचे रिंग ०५ ग्रॅम चे एक किंमत १४०० रु. तिन नाकातील सोन्याचे खड़े किंमत १५००, तीन जोडी मुलीची चांदीची पाय पट्टी अंदाजे एक तोळे किमत ४००० रु. एक गोल्ड रंगाची टायटन कंपनीची घडी किमत ३२९० रू. आणि एक वोट कंपनीचा डिजीटल घडी किमत १००० रू. तसेच आलमारीत ठेवलेले मातीचे ०३ गुल्लक मधिल एकुण नगदी २०,००० रु. असा एकुण ३०,१९० रुप याचा मुद्देमाल अज्ञात चोरानी चोरून पसार झाल्याची तक्रार केल्याने कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात पोलीसानी अज्ञात आरोपी विरूध्द अपक्र व कलम ४६४/२०२४ कलम ३०५ (१) ३३१ (४) भा.न्या.सं अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपी शोध घेत आहे.