नागपूर :- पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत प्लॉट नं. १०१, आनंद गृह निर्माण सोसायटी बेसा, बेलतरोडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे किशोर सोमाजी खोब्रागडे, वय ४० वर्षे, यांनी वडीलांचे पेंशन संबंधीत कागदपत्राची पाहणी करण्याकरीता बेडरूम मधील कपाट बघीतले असता, कपाटाचे लॉकर तुटलेले दिसुन आले व कपाटामध्ये ठेवलेले रोख १०,०००/- रु. दिसुन आले नाही. दिनांक १०.१०.२०२४ चे १३.०० वा. चे सुमारास फिर्यादीच्या आई घराला कडी-कोंडा लावुन बाजूला भजनाला गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घरात प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीतील रोख १०,०००/- रू. चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे बेलतरोडी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी नामे सुरज मारोतराव वानखेडे, वय ४२ वर्षे, रा. प्लॉट नं. २०७, भांडेप्लॉट, उमरेड रोड, सक्करदरा, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन रोख १०,०००/-रू., नोकीया कंपनीचा एक मोबाईल फोन, हिरो होन्डा पेंश्प्त प्रो दुचाकी असा एकुण किंमती अंदाजे ४१,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस मुद्देमालसह पुढील कारवाई करीता बेलतरोडी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. कमलाकर गड्डीमे, पोउपनि अविनाश आयभाये, पोहवा. निलेश होणे, युवानंद कडू, अभिषेक शनिवारे, नाजीर शेख, पुरुषोत्त जगनाडे व पोअं, महेश काटवले यांनी केली.