नागपुर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनी दिक्षाभुमीवर येणा-या बॊध्द अनुयायांची गैरसोय होणार नाही याची पुर्ण काळजी म.न.पा. घेणार अशी ग्वाही आयुक्त अभिजित चॊधरी यांनी दिली.
येत्या २२,२३,२४,२५ सलग चार दिवस मनपा कर्मचारी, अधिकारी दिक्षाभुमी परिसरात राबुन भारताच्या कानाकोप-यातुन येणा-या बॊध्द बाधवांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देणार.
मागिल काही वर्षापासुन मनपा,प्रशासनाचे आवश्यक सोयी उपलब्धते कडे सजगतेत कमतरता आहे अशी ओरड होती.या अनुषंगाने रिपाईच्या वतिने धम्म अनुयायांना येणा-या अडचणि बाबत सविस्तर चर्चा मनपा आयुक्तांशी करण्यात आली.
पिण्याचे पाणि,शॊचालय, विद्युत व्यवस्था, वाहतुक, भोजन व्यवस्था इ.बाबत लिखीत निवेदन देण्यात आले.
विषेश म्हणजे १४) ऑक्टोबर ला दिक्षाभुमी परिसरातिल स्ट्रिट लाईट बंद असल्याकारणाने जनतेचा रोष वाढला होता.चुकांची त्वरित दुरुस्ति करुन त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. असे सुचविण्यात आले.
या प्रसंगी बाळु घरडे, निखिल कांबळे, अशफाक अली, हरीष लांजेवार, राहुल मेश्राम, इमरान अली. मुस्तकीम शेख उपस्थित होते.