बुटीबोरी येथे बुद्धधम्म ज्ञान परीक्षा संपन्न

– युवकांसह आबालावृदानी दिली परीक्षा,चंद्रपूर पासून आले होते परीक्षार्थी

– धम्मचक्र प्रवर्तन उत्सव समितीचा उपक्रम

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन उत्सव समिती, बुटीबोरी सातगाव परिसर यांचेकडून दि ०८ ऑक्टो ला बुटीबोरी येथील जिजामाता विद्यालयात बुद्ध आणि धम्म या विषयावर बुद्ध धम्म ज्ञान परीक्षा पार पडली.

तथागथांनी जगाला सर्वांग सुंदर व विज्ञानवादी धम्म दिला.”तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी” या ब्रिदा प्रमाणे बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार व बौद्ध अनुयायांना आपल्या धम्माचे व्यापक ज्ञान व्हावे तसेच त्यांना वाचनाची सवय लागावी ही उदत्त भावना मनात बाळगून धम्मचक्र प्रवर्तन उत्सव समिती, बुटीबोरी यांनी दि ०८ ऑक्टो ला बुद्ध धम्म ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक दोन हजार,द्वितीय पारितोषिक पंधराशे तर तृतीय पारितोषिक एक हजार रुपये असून, विजेत्यांना हे बक्षीस १४ ऑक्टो ला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्या आयोजित कार्यक्रमात देण्यात येईल.

महत्वाची बाब अशी कि,ही स्पर्धा परीक्षा १५ ते ६० वयोगटात आयोजित करण्यात आली होती. परंतु परीक्षाकेंद्रावर अचानक उपस्थित झालेले ७४ वर्षीय कवडुजी पाटील व जिजाबाई खोब्रागडे यांचा उत्साह व हट्ट बघून त्यांना परीक्षेला बसू द्यावे लागले.या स्पर्धा परीक्षेला एकूण ५६ परीक्षार्थिनी सहभाग घेतला त्यात उपेंद्र विजय वनकर हा परीक्षार्थी स्पर्धक चंद्रपूर येथून परीक्षे करीता आला होता हे विशेष.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रार प्राप्त

Mon Oct 9 , 2023
नागपूर :- विभागीय लोकशाही दिनात आज नव्याने तीन तक्रार अर्ज प्राप्त झाले, प्रलंबित प्रकरणांवर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित लोकशाही दिनात  बिदरी यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले व प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, नायब तहसीलदार आर.के.डिघोळे, यांच्यासह सहकार, आरोग्य, महानगरपालिका, पोलीस, महिला व बालविकास, भूमापन, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com