बसपा आज उमेदवारी अर्ज भरणार

नागपूर :- बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावती यांच्या दिशा निर्देशानुसार बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रातील प्रथम फेरीचे पाचही लोकसभा उमेदवार स्वबळावर लढवीत आहे.

उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने बसपाचे नागपूर व रामटेकचे दोन्ही उमेदवार सकाळी 11 वाजता संविधान चौकात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपले उमेदवारी अर्ज सादर करतील.

याप्रसंगी बसपाचे राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रदेश चे मुख्य प्रभारी खा रामजी गौतम यांच्या निर्देशाने प्रदेश प्रभारी नितीन सिंग, प्रदेशाध्यक्ष ऍड परमेश्वर गोणारे, राज्याचे महासचिव व विदर्भ झोनचे इन्चार्ज ऍड सुनील डोंगरे, पृथ्वीराज शेंडे, दादाराव उईके प्रामुख्याने उपस्थित राहतील. फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या नागपूर येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Wed Mar 27 , 2024
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. सुनील मेंढे यांचे उमेदवारी अर्ज दाखल नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पाचे सरसेनापती असलेल्या नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर येथे केले. नागपूर मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष महायुतीचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com