नागपूर :- बसपा हा राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या क्रमांकाचा राजनीतिक पक्ष असला तरी राज्यात त्याला मान्यतेसाठी अजून पर्यंत हवी तेवढी मते व निकाल मिळालेला नाही. येत्या 2024 च्या निवडणुकीत बसपाला राज्यात मान्यताप्राप्त होण्याऐवढि मते मिळतील व निकालही मिळेल असा विश्वास बसपा नेत्यांनी व्यक्त केला.
बहुजन नायक व बसपाचे संस्थापक मान्यवर कांशीराम यांच्या 90 व्या जन्मदिना निमित्त आयोजित हिंदी मोर भवनातील बहुजन समाज दिवस कार्यक्रमात बसपा नेत्यांनी हे वक्तव्य केले.
बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव व विदर्भ झोनचे इन्चार्ज ऍड सुनील डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारोहात महाराष्ट्र प्रदेश सचिव व विदर्भ झोन इन्चार्ज पृथ्वीराज शेंडे, इंजि दादाराव उईके, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, विलास सोमकुवर, दिल्लीतील जेष्ठ पत्रकार मुकेश सरकार, मुंबईतील साहित्यिक शूद्र शिवशंकर यादव आदींनी मार्गदर्शन केले.
कांशीरामजींचा जन्मदिवस, देशभर बहुजन समाज दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहुजन चळवळीत कार्य करणाऱ्या सक्रिय ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना कांशीराम रत्न जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावेळी नागपुरातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कांशीरामजींच्या अस्थिकलशा समोर बसपा कार्यकर्त्यांनी बसपाला यश मिळेपर्यंत सक्रियरित्या कार्य करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांनी, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी तर समारोप जिल्हा सचिव अभिलेश वाहाने यांनी केला.
बसपा संस्थापक कांशीराम यांच्या जयंती निमित्त संविधान चौक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रॅलीच्या स्वरूपात वाजत गाजत बसपा कार्यकर्ते झाशी राणी चौकापर्यंत आले. त्या रॅलीचे रूपांतर नंतर सभेत झाले. निवडणुकीच्या तोंडावर बसपा कार्यकर्त्यात व त्यातही विशेषता महिलांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.