नागपूर :-भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाच्या 206 व्या स्मृतिप्रित्यर्थ कही हम भूल न जाये या अभियानांतर्गत बसपाने दक्षिण नागपूरच्या त्रिशरण चौकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून भगवान नगर मार्गे बालाजी नगरातील त्रिशरण बुद्ध विहार परिसरात असलेल्या शौर्य स्तंभाच्या प्रतिकृती पर्यंत शौर्य रॅली काढली. या शौर्य रॅलीचे नेतृत्व विदर्भ झोनचे इन्चार्ज पृथ्वीराज शेंडे, दादाराव उईके, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, माजी प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांनी केले.
शौर्यरॅली बालाजी नगर येथील त्रिशरण बुद्ध विहार परिसरातील भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभाच्या प्रतिकृती पर्यंत पोहोचल्यावर शौर्यस्तंभास अभिवादन केल्यावर बसपाचे विदर्भ झोन इन्चार्ज पृथ्वीराज शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभा घेण्यात आली. या अभिवादन सभेत इंजि दादाराव उईके, उत्तम शेवडे, रंजना ढोरे, संजय जयस्वाल, सुरेखा डोंगरे यांनी आपला गौरवशाली इतिहास सांगून शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शौर्यदिन कार्यक्रमात प्रामुख्याने माजी नगरसेवक अजय डांगे, मंगेश ठाकरे, महेश सहारे, सदानंद जामगडे, रोहित ईलपाची, विकास नारायणे, आकाश खोब्रागडे, शंकर थुल, योगेश लांजेवार, नितीन वंजारी, महिपाल सांगोळे, सचिन मानवटकर, अंकित थुल, जगदीश गजभिये, गौतम गेडाम, प्रकाश फुले, राजकुमार बोरकर, राष्ट्रपाल पाटील, बालचंद्र जगताप, प्रेमदास पाटील, जगदीश गेडाम, भानुदास ढोरे, जितेंद्र पाटील, सुमित जांभुळकर, सुरेंद्र डोंगरे, चंद्रमणी गणवीर, सुमेध शेंडे, संबोधी सांगोळे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
एक जानेवारी हा पेशवाई संपविणारा दिन म्हणून बसपा दरवर्षी शौर्यरॅली काढून शौर्य दिन चिरायु हो च्या घोषणा देत-देत शौर्य स्तंभाच्या प्रतिकृतीस मानवंदना देत असते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांनी, सूत्रसंचालन जिल्हा सचिव अभिलेख वाहाने यांनी तर समारोप शहर प्रभारी सुमंत गणवीर यांनी केला.