नागपुर – संत तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने नागपूर शहर व जिल्हा बसपा तर्फे संत जगनाडे चौक नंदनवन येथील संताजीच्या पुतळ्याला आज बसपा चे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे, जेष्ट नेते कृष्णाजी बेले, उत्तम शेवडे, महिला नेत्या वर्षाताई वाघमारे ह्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
या प्रसंगी संताजी के सम्मान मे बीएसपी मैदान मे, संताजी का सपना अधुरा बीएसपी करेगी पुरा, संत जगनाडे महाराज अमर रहे आदी उत्साह वर्धक नारे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने भारुडकार हरिकीसनदादा हटवार, संजय लिखार, नरेंद्र शेंडे, जिल्हा सचिव नितीन वंजारी, माजी नगरसेवक सागर लोखंडे, शहर प्रभारी शंकर थुल, महासचिव विलास मूल, शहर कोषाध्यक्ष मुकेश मेश्राम, मध्य नागपूर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी दक्षिण-पश्चिम अध्यक्ष सदानंद जामगडे, माजी जिल्हा सचिव अभय डोंगरे, हर्षवर्धन डोईफोडे, प्रकाश फुले, विशाल कापसे आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.