संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- बहुजन समाज पार्टी कामठी विधानसभेच्या वतीने माजी बसपा कामठी विधानसभा अध्यक्ष इंजिनीयर विक्रांत मेश्राम यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ‘प्रमोद पोरे ‘यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व कामठी शहरातील वाढत असलेल्या गुन्हेगारी या विषयावर चर्चा करीत, शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले गुन्हेगारी, अवैध धंदे ,गांजा ,एमडी, दारु चे वाढीव व्यवसाय, शहरात होत असलेला अतिक्रमण, चंपा आश्रम परिसरात नॅशनल हायवे रोडची रुंदी कमी असल्यामुळे होत असलेल्या एक्सीडेंट, बोरा ट्रेडिंग ऑनलाइन ॲप च्या द्वारे झालेल्या बहुतांश लोकांची फसवणूक व कामठी शहरातील अन्य विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
यावेळेस प्रामुख्याने बहुजन समाज पार्टी कामठी विधानसभेचे अध्यक्ष चंद्रगुप्त रंगारी, कामठी विधानसभेचे उपाध्यक्ष अनिल कुरील , कामठी शहराचे अध्यक्ष विनय ऊके ,निशिकांत टेंभेकर, विशाल गजभिये, सुधा रंगारी, राम कुर्वे ,व अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.