– (दक्षिण पश्चिम कार्यकर्ता मेळावा)
नागपूर :- देशातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय व अल्पसंख्यांकाचे हित बसपात सुरक्षित आहे, आत्तापर्यंत ज्या पक्षांची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत होती व आजही आहे त्यांनी बहुजन समाजाकडे हेतूत: दुर्लक्ष केले. आम्ही पहाड फोडून रस्ता बनविणारे, समुद्रातून मोती शोधणारे असल्याने विखुरलेल्या बहुजन समाजाला संघटित करून बसपाच्या माध्यमातून त्यांना शासक बनवू शकतो, असा विश्वास बसपाचे केंद्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी भीम राजभर यांनी व्यक्त केला.
भीम राजभर हे उर्वेला कॉलनीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात दक्षिण-पश्चिम विधानसभा स्तरीय संघटन समीक्षा व कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे अध्यक्ष ऍड संदीप ताजने होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश बसपा चे प्रभारी व विदर्भ प्रदेशचे इन्चार्ज सुनील डोंगरे होते.
भीम राजभर कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना म्हणाले की बसपा ही आपली पार्टी असल्याचे बहुजन समाजाला सांगा. ओबीसींना जागवण्याचे व संघटित करण्याचे काम करा. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या बहणजींचे शासन आणण्यासाठी प्रयत्न करा.
याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव नितीन शिंघाडे, नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहर प्रभारी सुमंत गणवीर, ओपुल तामगडगे, शहराध्यक्ष शादाब खान, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, उत्तर प्रदेशचे मंत्री यशवंत निकोसे, मनपा पक्षनेता जितेंद्र घोडस्वार, गौतम पाटील, जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा डोंगरे, मिलिंद वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा अध्यक्ष शिवपाल नितनवरे यांनी, सूत्रसंचालन महिला आघाडीच्या नेत्या सुनंदा नितनवरे यांनी तर समारोप कमलदास गजभिये यांनी केला.