नागपूर :- संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 132 वा जन्मदिन दिवस व बहुजन समाज पार्टीचा 39 वा स्थापना दिवस (14 एप्रिल 1984) बसपाच्या नागपुरातील विभागीय प्रदेश कार्यालयात व संविधान चौकात साजरा करण्यात आला.
बसपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या जयंती व पक्ष स्थापना दिन कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश बसपाचे महासचिव नागोराव जयकर, मा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी प्रा सुनील कोचे, शहर प्रभारी विकास नारायणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी यांनी तर समापन जिल्हा सचिव अभिलेश वाहने यांनी केला.
देशात महात्मा फुलेंच्या भाषेतील प्रस्थापित ब्राह्मण-बनियाच्या पार्ट्या आहेत. बसपा हीच एकमेव बहुजनांची प्रथम क्रमांकाची व राष्ट्रीय स्तरावरील तिसऱ्या क्रमांकाची राजकीय पार्टी आहे. त्यामुळे बहुजनांनी संविधान व देश रक्षणासाठी विनाविलंब बसपा चा स्वीकार करावा असे आवाहन याप्रसंगी बसपा नेत्यांनी केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, माजी नगरसेवक इब्राहिम टेलर, प्रा किरण कुमार पाली, तपेश पाटील, मनोज गजभिये, श्रीकांत बडगे, बुद्धम राऊत, नितीन वंजारी, अंकित थुल, राजरत्न कांबळे, एड राजकुमार शेंडे, एड सुरेश शिंदे, प्रकाश फुले, योगेश लांजेवार, जगदीश गजभिये, वीरेंद्र कापसे, राजेश नंदेश्वर, संजय बनसोड, राजेंद्र सुखदेवे, सिद्धार्थ साखरे, सुमित जांभुळकर, राजू मून, अनिल मेश्राम, अशोक रंगारी, ज्ञानेश्वर बांगर, यादव भगत, देवेंद्र वाघमारे, दीपक खंडाळे, रामराव निकाळजे आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते