पारडसिंगा :- दिवसेंदिवस बदलत चाललेले वातावरण व त्यामुळे आरोग्याबरोबरच डोळ्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. भारत देश लोकसंख्येच्या बाबतीत अग्रणीअसून लाखो नागरिक जन्मत:च अंध आहेत तर लाखोंना अंधत्व आलेले आहे. अशा परिस्थितीत अंधत्वाकडून रोषणाईकडे नेण्याचे पुण्यवान कार्य आपल्या माध्यमातून होऊ शकते. त्याकरिता आपण मातेच्या चरणी नेत्रदानाचा संकल्प घ्यावा असे प्रतिपादन माधव नेत्रालय व नेत्रपिढी, नागपूरचे संचालक डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यांनी केले.
ते श्री सती अनुसया माता संस्थान, पारडसिंगा व माधव नेत्रालय नागपूरच्या संयुक्त विद्यमाने संस्थान परिसरात आयोजित निःशुल्क नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माधव नेत्रालय व नेत्रपिढीचे संचालक डॉ. अनिल शर्मा, तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रा.डॉ कैलास कडू, संस्थेचे उपाध्यक्ष धनराज बेलसरे, विश्वस्त किशोर गाढवे,माजी सरपंच दिलीप तिजारे उपस्थित होते. दिवाकर सोमकुवर, महेंद्र खंडाईत यांचे सहकार्य लाभले तर मोरेश्वर गवळी, वासुदेव बावणे, विष्णू पेलागडे, सुमित बबूटा, प्रज्वल, सचिन ढोले, अमोल चौधरी, अमोल चौरे, सुरेंद्र हजारे, सुनील मेटांगळे यांनी परिश्रम घेतले.
नेत्र तपासणी शिबिराचा शुभारंभ आई अनुसयेच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलननाणे डॉ. चक्रवर्ती यांचे हस्ते करण्यात आले. आयोजीत नेत्र तपासणी शिबिरात माधव नेत्रालयाचे शिबिर आयोजन प्रमुख द्वारकासिंग आशिया व अनिरुद्ध सोमन यांचे मार्गदर्शनात नेत्ररोग तज्ञ डॉ. रश्मी सिंग, डॉ. शुभम वाणी व डॉ. निकिता कोरडे यांनी एकूण 165 नेत्र रुग्णांची तपासणी व आवश्यकतेनुसार वैद्यकीय मार्गदर्शन करून संस्थानचे वतीने आयड्रॉपचे विनामूल्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन संस्थानचे विश्वस्त वैभव विरखरे यांनी केले.