पॉवरलिफ्टिंगमध्ये दिनेश बागडेला कांस्यपदक

– महाराष्ट्र (९, ६, १२) २७ पदकांसह सहाव्या स्थानावर

-नेमबाजीत स्वरुप उन्हाळकरला अपयश

– टेबल टेनिसमध्ये आगेकूच

नवी दिल्ली :- केंद्र सरकार आणि साई यांच्या संयुक्त उपक्रमाने सुरु असलेल्या पहिल्या पॅरा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सलग दुसऱ्या दिवशी एका ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राची स्पर्धेत आता ९ सुवर्ण, ६ रौप्य, १२ ब्रॉंझ अशी २७ पदके झाली असून, ते सहाव्या स्थानावर आहेत. हरियाना ३५ सुवर्ण, ३७ रौप्य, १९ ब्रॉंझपदकांसह ९१ पदके मिळवून अग्रस्थान टिकवून आहे. उत्तर प्रदेश (२४, १८, ९) ५१, तमिळनाडू (१७, ६, १३)३६, गुजरात (११, १६, ११) ३८ आणि राजस्थान (९, १९, ११) ३९ पदकांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थनावर आहेत.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या पॅरा पॉवरलिफ्टर दिनेश बागडेने शुक्रवारी महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या एलिट १०७ किलो वजन गटात १४८ किलो वजन उचलून ही कामगिरी केली. त्याचे रौप्यपदक केवळ दोन किलोंनी हुकले. राजस्थानच्या मिलन कुमारने १५० किलो वजन उचलताना रौप्यपदकाचा मान मिळविले. महाराष्ट्राचे हे या क्रीडा प्रकारातील चौथे पदक ठरले.

*कामगिरी समाधानकारक – सारिका सरनाईक*

पहिल्याच स्पर्धेत महाराष्ट्राने चार पदके मिळवून आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे. खेळाडूंच्या कठोर मेहनतीमुळेच हे यश मिळाले असून, यामुळे भविष्यात अनेक युवकांना या कामगिरीने प्रेरणा मिळेल, अशा शब्दात प्रशिक्षक सारिका सरनाईक यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.

टेबल टेनिसमध्ये आगेकूच

महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी चमकदार कामगिरी करताना आपली आगेकूच कायम राखली. पुरुष गटात दत्तप्रसाद चौगुले, विश्व तांबे यांनी विजय मिळविले. महिला गटात क्लास ६ प्रकारातून वैष्णवी सुतार आणि उज्वला चव्हाण यांनी प्रत्येकी दोन विजय मिळवून आपली गुणवत्ता दाखवून दिली. या कामगिरीने महाराष्ट्राची या खेळातील पदकाची खात्री निर्माण झाली आहे.

*टेबल टेनिस निकाल -*

क्लास ९ – दत्तप्रसाद चौगुले वि. वि,. ब्रिजेंद्र सिंग ११-३, ११-९, ११-२

क्लास १० – विश्व तांबे वि.वि. जगन्नाथ मुखर्जी ११-५, १६-१४, ८-११, ११-५, ओम लोटलीकर पराभूत वि. हितेश दलवानी ७-११, ८-११, ७-११

क्लास ८ – स्वप्नील शेळके पराभूत तुषार नागर ९-११, ७-११, ११-९, ८-११

क्लास ५ – विवेक मोरे पराभूत वि. आर. अलागर ४-११, ५-११, ४-११, रिषीत नथवानी वि.वि. अभिषेककुार सिंग ११-५, ११-४, ११-७

*महिला -*

क्लास ६ – वैष्णवी सुतार पराभूत वि. भाविका कुकाडिया ७-११, ९-११, ६-११, वैष्णवी सुतार वि.वि. नयना कांबळे ११-१, ११-१, ११-१,

क्लास ९,१० – पृथ्वी बारे वि.वि. मेहक कासार ९-११, १७-१५६, ८-११, ११-५, ११-९,

क्लास ६ – उज्वला चव्हाण पराभूत वि. पूनम ३-११, ४-११, ७-११, उज्वला चव्हाण वि.वि. उर्मिला पाल ११-७ ११-८, ४-११, १४-१२

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या अंमलबजावणीत नागपूर जिल्हा आघाडीवर

Sat Dec 16 , 2023
नागपूर :- जिल्हयातील 195 ग्राम पंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची व्हॅन पोहोचली असून 1 लाख 20 हजार नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. या मोहिमेमध्ये लोकप्रतिनिधीही सहभागी होत आहेत. या मोहिमेंतर्गत नागरिकांपर्यंत ज्या योजना पोहचविण्यात आल्या आहेत. या मोहिमेच्या अंमलबजावणीत नागपूर जिल्हा राज्यात आघाडीवर असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 16 डिसेंबरला दुपारी 4 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विकसित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com