नागपूर :- श्री संत रविदास महाराज मित्र परिवाराच्या वतीने नागपूर येथील श्री संत रविदास सांस्कृतिक सभागृह हनुमान नगर येथे वधु -वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जीवन यापनाच्या व्यस्ततेत विवाह योग्य युवक युवती करिता नातेसंबंध जुळविण्याचे काम हल्ली विवाह संस्था मार्फत होऊ लागलेले आहे. परंतु विवाह संस्थेमार्फत होणारे नातेसंबंध टिकाऊ दिसत नाही अशी परिस्थिती समाजात आढळून आल्यामुळे श्री संत रविदास महाराज मित्र परिवार च्यावतीने नवदांपत्याच्या उज्वल भविष्यासाठी, समाज बांधवांच्या उपस्थितीत वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करून सामाजिक ऋण फेडण्याचा एक प्रयत्न करण्यात आला.
वधू -वर परिचय मेळाव्याच्या या आयोजनाला उद्घाटक म्हणून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. नितीन गडकरी यांनी द्वीप पज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन केले. चर्मकार समाजाच्या परिचय मेळाव्यात 300 च्या वर युवक युवतींनी भाग घेऊन स्वतःचा परिचय दिला. यावेळी युवक युवतींच्या परिवारा सोबतच कार्यक्रमात सात आठशे लोकांनीं सहभाग घेतला. श्री संत रविदास महाराज युवा मित्र परीवार कडून आयोजित करण्यात आलेल्या चर्मकार समाजाच्या भव्य वर-वधू परिचय मेळाव्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कृपाल तुमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरवातीला कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना संबोधित करताना नव्याने नातेसंबंध जुडणाऱ्या नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सामाजिक संस्थेद्वारे अशा पद्धतीचे आयोजन वारंवार करण्यात यावे आणि सामूहिक विवाह सोहळे पार पडावे याकरिता त्यांनी सक्करदरा येथील बुधवार बाजार या ठिकाणावर भविष्यात दहा हजार लोकांची व्यवस्था होणार अशा पद्धतीचे समाज भवन बांधून देण्याची उपस्थितांना ग्वाही दिली. तर कार्यक्रमाची सांगता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्मकार समाजातील युवक युवतींना आशीर्वाद देऊन केली. श्री संत रविदास महाराज मित्र परिवारा च्यावतीने हनुमान नगर येथील वधु -वर मेळाव्याच्या आयोजनला प्रामुख्याने केन्द्रीय मंत्री नितिन गड़करी, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने, आयोजक हितेश मुंदाफळे मंचावर उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणारे प्रामुख्याने उपस्थित संदीप वासनकर, नरेन्द्र मालखेडे, पवन मालखेडे, स्नेहल वासनकर, प्रिया मुंदाफळे, अश्विनी मालखेडे, रूपाली मालखेडे, अनिकेत आग्रे सह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.