संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील मच्चीपुल चौक रहिवासी आरोपी समीर ऊर्फ लंगड्या ला काही महिन्यापूर्वीच 19 जानेवारी 2022 ला हद्दपार करण्यात आले होते मात्र सदर आरोपी हद्दपार आदेशाचे उल्लंघन करीत नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत परिसरातील बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह परिसरात अवैधरित्या फिरत असल्याची गुप्त माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पिल्ले व राजू टाकळीकर यांनी सदर आरोपीस ताब्यात घेऊन कलम 142 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.