ब्रेकडाऊन : ३०० मी मी व्यासाची मुख्य जलवाहिनी राम नगर चौक येथे क्षतिग्रस्त 

– राम नगर जलकुंभ,सिव्हिल लाईन जलकुंभ, आयबीएम जलकुंभ तसेच लक्ष्मीनगर जलकुंभ ह्यांचा पाणीपुरवठा बाधित 

नागपूर :- दक्षिण -पश्चिम नागपुरातील राम नगर जलकुंभ आणि लक्ष्मी नगर जलकुंभ ला जोडणारी ३०० मी मी व्यासाची मुख्य जलवाहिनी राम नगर चौक येथे क्षतिग्रस्त झाली आहे . नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर ह्यांनी ह्या जलवाहिनीला झालेल्या क्षती ला दुरुस्त करण्याचे काम तातडीने सुरु केले आहे. ह्या क्षतीमुळे धरमपेठ झोन अंतर्गत – राम नगर जलकुंभ,सिव्हिल लाईन जलकुंभ, आयबीएम जलकुंभ तसेच लक्ष्मीनगर झोन मधील लक्ष्मीनगर जलकुंभ ह्यांचा पाणीपुरवठा आज मंगळवारी ( ५ सप्टेंबर) ला बाधित राहिला तसेच उद्या दिनांक ६ सप्टेंबर (बुधवार) रोजी जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत बाधित राहणार आहे.

ह्या ब्रेकडाऊनमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग 

धरमपेठ झोन : रामनगर जलकुंभ : शिवाजी नगर, गांधी नगर, शंकर नगर, डागा ले आउट, कॉर्पोरेशन कॉलोनी, खरे टाऊन , त्रिकोणी पार्क , मामा रोड, दंडिगे ले आउट, धरमपेठ , सिविल लाईन्स , मॅरियम नगर, रवींद्रनाथ टागोर रोड , विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राउंड रोड , पाल्म रोड, शासकीय मुद्रणालय , दामोदर कॉलोनी, नागपूर महानगरपालिका सिविल लाईन्स , विधान भवन, रामगिरी रोड, हाय कोर्ट परिसर , रवी नगर, तेलंग खेडी हनुमान मंदिर चा भाग

लक्ष्मी नगर झोन : लक्ष्मीनगर ( जुने )जलकुंभ: बजाज नगर, अभ्यंकर नगर, लक्ष्मी नगर , राहते कॉलोनी, वसंत नगर आठ रास्ता चौक , अत्रेय लय आउट , पी & टी कॉलनी, इन्कम टॅक्स कॉलोनी, श्रद्धानंद पेठ चौक चा परिसर , माटे चौक , आर पी टी एस कॉलोनी, एम आय जी कॉलनी , एच आय जी कॉलोनी , एल आय जी कॉलोनी, धनगरपूर, प्रताप नगर रोड माधव नगर, गिट्टीखदान ले आउट तात्या टोपे नगर, बुटी ले आउट, फ्रेंड्स कॉलोनी, सुरेंद्र नगर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोकणातील आंबा उत्पादकांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

Wed Sep 6 , 2023
– अवकाळीतील पीक कर्ज व्याज माफीची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश – आंब्याचे उत्पादन वाढविणे, किडीमुळे नुकसान थांबविण्यासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापणार मुंबई  :- अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्यांची व्याजमाफी आणि पुनर्गठित कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही लगेच सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com