अमरदिप बडगे
– प्रकरण मागे घेण्यासाठी कुटुंबांवर दबाव चर्चा ..
– पोलीस ठाण्यात माळी समाज व विविध संघटनांचा मोर्चा..
– गावात तणावाचे वातावरण..
गोंदिया – एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने चार वर्षाच्या चिमुकलीवर चाँकलेट घेण्यासाठी आली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे घडली आहे. दरम्यान ही बाब परीसरातील नागरीक आणि मुलीच्या आईच्या लक्षात येताच हे बिंग फुटले असून दरम्यान या प्रकाराबाबत अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.
मात्र पिडित मुलीच्या कुटूंबियांना प्रकरण मागे घेण्यासाठी आरोपीच्या कुटूंबियांकडून दडपण आणले जात असल्याने माळी समाजासोबत विविध संघटनांनी भर पावसात मोर्चा काढून पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून गावात तणावाचे वातावरण पसरले आहे.