– रेल्वे ई तिकीटांचा काळाबाजार
– पाच लाख रुपये किंमतीच्या 256 जुने तिकीटे जप्त
– 188 खाजगी आयडीचा वापर
नागपूर :-रेल्वे ई तिकीटांचा काळाबाजार करणार्या युवकाला आरपीएफ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफिने पकडले. अनिकेत सवाई, (30), रा. जरीपटका असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पाच लाख रुपये किंमतीच्या 256 जुन्या आणि दोन लाईव्ह रेल्वे तिकीट तसेच दोन साप्टवेअर, संगणक व इतर साहित्य जप्त केले आहे.
आरपीएफच्या स्थानिक गुन्हे शाखेला रेल्वे तिकीटांचा काळाबाजार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे निरीक्षक नवीन प्रताप सिंग आणि एएसआय आर. के. भारती यांनी एक पथक तयार केले. पथकात जसबिर सिंह, एएसआय मुकेश राठोड, शिपाई जसबिर सिंह, सागर लाखो, शाम झाडोकर यांचा समावेश होता.
तपासणी दरम्यान आयुष उरकुडे यांच्याकडे एक तिकीट मिळाली, त्यासंबधी पथकाने विचारपूस केली असता अनिकेतकडून तिकीट खरेदी केल्याचे त्याने सांगितले. यावरून पथकाने अनिकेतवर पाळत ठेवली. संपूर्ण खात्री पटताच त्याच्या घरी धाड मारली.
त्याच्या घरुन दोन सॉफ्टवेअर, दोन लाईव्ह तिकीट आणि जुने 256 तिकीटे असा एकूण 4 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आयआरसीटीसी कडून संपूर्ण डेटा गोळा केला असता त्याने 188 आयडीचा वापर करून गेल्या तीन महिण्यात 23 लाख 99 हजार रुपयांची तिकीटे विक्री केल्याचे समोर आले. ही कारवाई मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
@ फाईल फोटो