– रेल्वेने आले होते नागपूर स्थानकावर
नागपूर :-नवीन ठिकाण आणि सारेच अनोळखी असल्याने बालगृहातील दोन बालकांनी पळ काढला. या घटनेमुळे बालगृहात चांगलीच खळबळ उडाली. दुसर्या दिवशी बालगृह कार्यालयाकडून पोलिसांकडे तक्रार नोंदविणार तोच पोलिसांनी त्यांना बालगृहात आणले. आता दोन्ही बालक बालगृहात आनंदात आहेत. राजेश आणि रितेश (काल्पनिक नाव) असे त्या बालकांचे नाव आहे.
राजेश (12) आणि रितेश (13) वर्षांचा आहे. राजेश उत्तर प्रदेशचा तर रितेश पश्चिम बंगालचा आहे. बनारसला लग्न समारंभात या दोघांची भेट झाली. राजेशचा भाउ चेन्नईला काम करतो. त्यामुळे दोघांनीही चेन्नईला जाण्याची योजना आखली. रेल्वेने नागपुरपर्यंत आले. येथून त्यांना चेन्नईला जायचे होते. दरम्यान रात्री 10 वाजताच्या सुमारास प्लॅटफार्म क्रमांक 2 वर असताना खाद्य पदार्थ विक्रेता रोशनचे लक्ष या बालकांवर गेले. त्याने विचारपूस करून लोहमार्ग ठाण्यात आणले. पोलिस कर्मचारी हेमंत निबांर्ते यांनी कागदोपत्री कारवाई नंतर चाईल्ड लाईनला कळविले. लोहमार्ग पोलिस आणि चाईल्ड लाईन प्रतिनिधीने दोन्ही बालकांना पाटणकर चौकातील बालगृहात रवाना केले.
मात्र, नवीन ठिकाण असल्याने त्यांना करमत नव्हते. त्यांनी शनिवारी रात्री पळ काढला. मात्र, राजेश पळून जाण्यात अपयशी ठरला. पेट्रोलिंगवर असलेल्या स्थानिक पोलिसांना रितेश मिळाला. त्यांनी विचारपूस करून त्याला परत बालगृहात आणले. आता दोघेही आनंदी आहेत. त्यांच्या पालकांना सुचना देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
@ फाईल फोटो