मालेवाडा येथे संत निरंकारी मडळाचे रक्तदान शिबीर

– रक्तदान परोपकाराद्वारे कर्मा ने ईश्वर भक्ती – किशन नागदेवे

– 82 पुरुष व 4 महिला एकूण 86 यूनिट रक्तदान

मालेवाडा :- संत निरंकारी मंडळ, शाखा मालेवाडा च्या वतीने आज प्राथमिक आरोग्य केंद्र, मालेवाडा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले. या शिबीरात 82 पुरुष व 4 महिला असे एकूण 86 लोकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथे रक्त टंचाई झाल्यामुळे त्यांनी मंडळाला विनंती करताच मानवसेवे साठी संत निरंकारी मंडळा द्वारे तातडीने मालेवाडा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले.

शिबीराचे उद्‌द्घाटन संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज किठ्ठान नागदेवे यांचे हस्ते गिता कुमरे, माजी जि.प. सदस्य, हटिशष निरंकारी, क्षेत्रीय संचालक, सेवादल, कन्हैयालाल डेंगानी, मोरे PSI, धनगम PSI, बोगा उपसरपंच, डॉ. उंदिरवाडे, होडमाके, उमेश नंदनवार, सुभाष गुंडरे, सुरेखा वनस्कर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

उद्घाटन पर संबोचनात किहान नागदेवे यांनी रक्तदान हे परोपकारा द्वारे कर्मा ने ईश्वर भक्ती असून या सत्कर्मा द्वारे रक्तदात्याला अंतर आत्माला जो समाधान मिळतो तो ईश्वराचा आर्शीर्वादच आहे.

संत निरंकारी मंडळाद्वारे दरवर्षी जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा, गडचिरोली, चामोर्शी, आष्टी इ. शाखे मध्ये रक्तदान शिबीरांचे आयोजन करून जवळपास 800-1000 युनीट रक्तदान केला जातो. मानव सेवेसाठी समर्पित संत निरंकारी मंडळा द्वो स्वच्छता इ. असे अनेक समाजसवेचे कार्य निस्वार्थ, समर्पण भावनेने केले जातात.

मान्यवरांचे हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यांत आले. रक्त संकलना साठी रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय, गडचिरोली यांचे सर्व चमू यांनी परिक्षम घेतले. शिबीराचे यशस्विते करिता ब्रांच मालेवाडा मुखी कृष्णा किंचक, सेवादल संचालक, कार्तीक धकाते व सर्व महीला पुरुष सेवादल सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शिबीराला यशस्वी केल्याबद्दल संत निरंकारी मंडळाचे शाखा – मालेवाडा कडून सर्वांचे आभार व्यक्त करण्यांत आले. कार्यकमाचे संचालन कृष्णा किंचक व आभार प्रदर्शन कार्तीक यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कैबिनेट ने भारतीय रेलवे में कनेक्टिविटी बढ़ाने, यात्रा को आसान बनाने, लॉजिस्टिक्स लागत कम करने, तेल आयात कम करने और कार्बन डाइऑक्साइड उत्सर्जन कम करने के उद्देश्य से दो नई लाइनों और एक मल्टी-ट्रैकिंग परियोजना को मंजूरी दी

Thu Aug 29 , 2024
– परियोजनाओं की कुल अनुमानित लागत लगभग 6,456 करोड़ रुपये है और इसे 2028-29 तक पूरा किया जाएगा ।  – इन परियोजनाओं के निर्माण के दौरान लगभग 114 (एक सौ चौदह) लाख मानव दिवसों का रोजगार पैदा होगा ।  – 1360 करोड़ रुपये की लागत से सरदेगा-भालुमुड़ा (37 किलोमीटर) नई डबल लाइन का किया जाएगा निर्माण ।  बिलासपुर :-प्रधानमंत्री नरेन्द्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com