नागपूर :- भगवत पाठ सभेच्या वतीने आयआयटी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांमधील 2 फेब्रुवारी रोजी नागपुरात घेण्यात येणाऱ्या मॉ स्वरस्वती विद्या हवनाच्या नावाने सार्वजनिक हवन व अभिषेकाचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठे शुल्क आकारले जात असून अनिस तर्फे याचा विरोध केला जात आहे.
ज्या क्षेत्रातील संबंधित पोलीस ठाण्याने याबाबतीत दखल घेऊन त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा. व हे फसवणूक करणारे कर्मकांड थांबविण्यात यावे. अशी महाराष्ट्र अनिसने मागणी केली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पत्रपरिषद घेण्यात आली. त्यावेळी मंचावरील जिल्हाध्यक्ष जगजीत सिंग, राज्य सरचिटणीस संजय शेंडे, कार्याध्यक्ष गौरव आळणे, दक्षिण कार्याध्यक्ष आशु सक्सेना, जिल्हा प्रधान सचिव विनोद उलीपवार आणि जिल्हा प्रधान सचिव अशोक खोरगडे यांची मंचावर उपस्थिती होती.