आशीर्वाद कायम ठेवा; चंद्रपूरला अग्रेसर शहर बनवू : आमदार सुधीर मुनगंटीवार

शास्त्रीनगर व बंगाली कॅम्प येथील खुली जागा विकसित करण्याच्या कामाचे भूमिपूजन 
 
चंद्रपूर –  जनतेच्या शुभेच्छातून नवी ऊर्जा मिळते. शुभ आशीर्वाद कायम ठेवा; चंद्रपूरला अग्रेसर शहर बनवू, असा विश्वास माजी वन व वित्तमंत्री तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 
 
चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक २ मध्ये एकता गणेश मंडळांच्या खुल्या जागेत आणि बंगाली कॅम्प प्रभाग क्रमांक ४ मध्ये शास्त्रकार लेआऊट येथील खुल्या जागेत सौंदयीकरण आणि विकास कामे करण्यासाठी माजी वन व वित्त मंत्री तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
कार्यक्रमाला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सभागृह नेता देवानंद वाढई, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा उराडे, गटनेत्या जयश्री जुमडे, नगरसेविका अनुराधा हजारे, नगरसेविका आशा आबोजवार, नगरसेविका माया उईके, नगरसेवक सोपान वायकर, भाजपचे नेते प्रकाश धारणे, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, माजी नगरसेवक विठ्ठल डुकरे, नगरसेविका शितल गुरनुले, नगरसेविका वनिता डुकरे यांची उपस्थिती होती.
 
यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या, सुधिरभाऊ जो शब्द देतात, तो ते पाळतात. म्हणूनच जनतेच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर मनपा भाऊंच्या मार्गदर्शनात प्रयत्नरत आहे. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनी देखील आपले यथोचित मार्गदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

२.५० कोटीच्या मलवाहीनीच्या कामाचे भुमिपूजन

Fri Feb 11 , 2022
नागपूर ता.११ :  प्रभाग क्र.२७ ‘अ’ व नविन प्रभाग क्र. ३० अंतर्गत येणा-या हसनबाग ते स्वातंत्रनगर पर्यंतच्या परिसरात मलवाहिनी टाकण्याच्या कामाकरीता रु. २.५० कोटी मंजूर करण्यात आले. या कामाचे भुमिपूजन मा.श्री. अभिजीत वंजारी, आमदार विधान परिषद यांच्या शुभहस्ते, मा.श्री.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेता, मनपा, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख ‍अतिथी श्री. कमलाकर घाटोळे, प्रदेश महामंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उपस्थितीत दिनांक ११ फेब्रुवारी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com