मला आशिर्वाद द्या की मी गोरगरीबांची सेवा करीत राहील

– भंडारबोडी येथील पावनभुमीच्या कंम्पाऊंड वॉल व गेट च्या उद्घाटन प्रसंगी चौकसेंनी मागीतला सेवकांना आशिर्वाद

– चौकसेंतर्फे पावनभुमीला वॉल कंम्पाउंड व गेट ची भेट

– तब्बल २० वर्षापासुन सेवक झिझवत होते या त्या नेत्यांच्या कार्यालयाचे उंबरठे

रामटेक :-भगवान बाबा जुमदेव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक – तुमसर मार्गावरील भंडारबोडी येथील पावनभूमी भवनाला कम्पाउंड वॉल व गेट ची कमतरता होती. त्यासाठी येथील काही सेवकांनी गेल्या तब्बल २० वर्षापासुन या त्या नेत्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले मात्र त्यांना फोल ठरणाऱ्या आश्वासनाशिवाय काहीही हाती लागले नाही. शेवटी हताश होऊन येथील परमात्मा एक च्या सेवकांनी पर्यटक मित्र तथा सरपंच सघटनेचे चंद्रपाल चौकसे यांचेपुढे आपली कैफीयत मांडली. चौकसेंनी एका झटक्यात होकार देत बांधकाम अल्पावधीत उरकवले. दि. १५ जुलै ला त्याचा उद्घाटन व लोकार्पन सोहळा होता. त्यात चंद्रपाल चौकसे यांनी सेवक सेविकांना ‘ मी गोरगरीबांची सेवा करत राहील ‘ असा आशिर्वाद मागीतला.

भंडारबोडी येथील परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपुर द्वारा संचालित पावनभुमीला कम्पाउंड वॉल व गेट ची नितांत गरज होती. तेव्हा यासाठी मदतीचा हात देणाऱ्या अनेक नेत्यांपुढे येथील सेवकांनी समस्या ठेवली. यात तब्बल २० वर्षाचा कालावधी लोटून गेला मात्र सेवकांच्या हाती फोल ठरणाऱ्या आश्वासनांशिवाय काहीही लागले नाही. तेव्हा शेवटी हताश होऊन येथील गोपीचंद तूपट (काकाजी) मार्गदर्शक पावनभूमी भंडारबोडी, दिलीप कोलते (अध्यक्ष, पावनभूमी भंडारबोडी), सेवकराम दिवटे, हरिभाऊ तुपट व काही सेवक-सेविकांनी ही समस्या चंद्रपाल चौकसे यांच्यापुढे मांडली. चौकसेंनी विनविलंब त्यांच्या विनंतीला मान देऊन परमात्त्मा एक आश्रम पावनभूमी भंडारबोडी येथे संरक्षण भिंत व गेट बनवून दिले. या संरक्षण भिंत व गेटचे लोकार्पण व भुमीपुजन आज दिनांक १५ जुलै रोज शनिवारला रामधामचे संस्थापक, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचे शुभहस्ते पार पडले. दरम्यान या शुभप्रसंगी गोपीचंद तूपट मार्गदर्शक पावनभूमी भंडारबोडी, दिलीप कोलते (अध्यक्ष, पावनभूमी भंडारबोडी) व समस्त सेवक-सेविकां तर्फे चंद्रपाल चौकसे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर परमात्मा एक आश्रम पावनभूमी च्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रामुख्याने राजेश जयस्वाल (समाजसेवक रामटेक), गोपीचंद तूपट मार्गदर्शक पावनभूमी भंडारबोडी, दिलीप कोलते (अध्यक्ष, पावनभूमी भंडारबोडी), सेवकराम दिवटे, हरिभाऊ तुपट, गजानन मेश्राम, खेमराज तडस, प्रमोद डोणारकर, बाळा दिवटे, शिवशंकर ढोंगे, योगेश म्हात्रे, राजेंद्र तुपट, कारेमोरे, भगवान पचारे, अमर तरारे,  कैलास दिवटे, विजु तुपट, शैलेश जयस्वाल, राजु कापसे,  जगदीश सांगोडे, पंकज बावनकर, महेंद्र दिवटे, रुपेश वनवे व सेवक-सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझ्याजवळ खोके – ओके चा पैसा नाही – चौकसे

माझ्याकडे खोके – ओके चा पैसा नाही. मेहनतीतुन उभारलेला पैसा आहे, आणि त्यातीलच पैसा मी येथे चांगल्या कामी लावलेला आहे. निव्वळ फोल ठरणारे आश्वासन देणाऱ्या नेत्यांचा काय उपयोग असे म्हणत चंद्रपाल चौकसे यांनी आईने सांगीतल्याप्रमाणे मी माझ्या उत्पन्नाचा १० टक्के वाटा लोककल्यानाच्या कामी लावत असल्याचे सांगीतले व मी असाच गोरगरीबांची सेवा करीत राहील असा आशिर्वाद उपस्थित सेवक – सेविकांना मागीतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 9 वर्षाचा काळ हा सुवर्णकाळ - चंद्रशेखर बावनकुळे 

Mon Jul 17 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भारतीय जनता पार्टी जगात सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतू भाजप हा फक्त पक्ष नसून एक परिवार आहे हेच पक्षाच्या यशाचे गमक आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकी नंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचे सरकार आणण्याचा निर्धार देशवासीयांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सेवा, सुशासन व गरीब कल्याणाच्या संकल्पनेला ९ वर्षे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com