भाजपची जोरदार मुसंडी, आता देशात इतक्या ठिकाणी ‘कमळ’

नवी दिल्ली :- मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाना विधानसभा निवडणुकीच्या निकालाने आगामी लोकसभेचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट केले. देशाचा मूड काय आहे हे वेगळं सांगायला नको. अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी मतमोजणी सुरु आहे. हे काम अजून काही तास सुरु असेल. पण एकंदरीत सत्तेचे पारडे भाजपच्या बाजूने झुकल्याचे उघड झाले आहे. 3-1 असा निकाल लावण्यात भाजपला यश आले आहे. भाजपने काँग्रेसच्या हातून दोन राज्ये हिसकावली आहेत. मध्यप्रदेशमध्ये खूर्ची शाबूत ठेवली आहे. तर भाजपला राजस्थान आणि छत्तीसगडचे बोनस मिळाले आहे. तेलंगाणामध्ये बीआरएसला सत्तेतून खेचण्यात काँग्रेसला यश आले आहे. पण त्यांनी दोन राज्य गमावली आहेत. या विजयामुळे देशाच्या नकाशावर भगवे वादळ आले आहे. तर काँग्रेसची हुकमी राज्य हातून गेली आहे.

कोणत्या राज्यात कोणाचे सरकार

देशातील 28 राज्ये आणि विधानसभा असणारी दोन केंद्रशासित प्रदेश मिळून भाजप 16 राज्यात सत्तास्थानी आहे. काही ठिकाणी भाजपने युती केली आहे. या ठिकाणी एनडीएची सत्ता आहे. आता 12 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री असतील. या विधानसभा निवडणुकांपूर्वी 7 राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते वा आघाडीचे सरकार होते. आता ही संख्या 6 वर आली आहे. तर 8 अशी राज्य आहेत. जिथे ना काँग्रेस होती ना भाजप. अर्थात काही राज्यं I.N.D.I.A. आघाडीची आहेत. त्यात काँग्रेस हा मुख्य पक्ष आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नव भारताने संधींचे लोकशाहीकरण आणि त्याबरोबरच यश आणि समृद्धीसाठी अनुकूल वातावरण तयार केले आहे - राजीव चंद्रशेखर

Sun Dec 3 , 2023
नवी दिल्ली :-केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर सध्या केरळच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज त्यांनी कोझिकोड येथे नालंदा सभागृहात सनदी लेखापाल विद्यार्थ्यांना सत्संग 2023 या महापरिषदेत मार्गदर्शन केले. भारतीय युवक आणि स्टार्टअपसाठी संधी निर्माण करण्यासाठी नव भारत तंत्रज्ञानाची सांगड घालत असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. गेल्या दशकात संधींच्या झालेल्या लोकशाहीकरणाचे महत्त्व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com