11 फेब्रुवारी पर्यंत भाजपाचे ‘गाव चलो अभियान’

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून भाजपच्या ‘गाव चलो अभियानाला’4 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून हे अभियान 11 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे.या दरम्यान कामठी तालुक्यातील नेमून दिलेल्या गावात 14 प्रवासी कार्यकर्ते मुक्काम करणार असून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार असल्याची माहिती भाजप चे नागपूर जिल्हा महामंत्री व नागपूर जिल्हा परिषद चे माजी विरोधी पक्ष नेता अनिल निधान यांनी आज 7 फेब्रुवारी ला भाजप कामठी शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.

यावेळी पत्रकार परिषदेला आमदार टेकचंद सावरकर, भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव कपिल गायधने, चेतन खडसे, भाजप शहर अध्यक्ष चंद्रशेखर तूप्पट,भाजप कामठी तालुका ग्रामीण अध्यक्ष उमेश रडके,भाजप ओबीसी जिल्हा महामंत्री किशोर बेले, आशिष फुटाणे,ब्रम्हा काळे,सुनिल खांनवानी, पंकज वर्मा,गोपाल सीरिया, राजकीरण बर्वे,नरेशचंद्र कलसे, झमतांनी आदी पदाधिकारी गण प्रामुख्याने उपस्थित होते.

या अभियाना दरम्यान निवडण्यात आलेले 14 बूथ प्रवासी कार्यकर्ते त्यांना नेमुन दिलेल्या गावागावात मुक्काम करणार असून यावेळी हे कार्यकर्ते गावातील बूथ मजबूत करण्याचे कार्य करणार आहेत.तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्वसामान्य सोबत संवाद साधणार असून केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावागावात पोहोचल्या किंवा नाही याची खातरजमा करणार आहेत.

यानुसार नेमून दिलेले 14 कार्यकर्तेतील भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदार संघातील वडोदा गावात, भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे हे नागपूर ग्रामीण मंडळ अंतर्गत येणाऱ्या उनरगाव, आमदार टेकचंद सावरकर हे मौदा मंडळ अंतर्गत येणाऱ्या चिचोली, भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान हे कामठी तालुक्यातील गुमथळा,जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल हे कामठी शहर,भाजप कामठी विधानसभा निवडणूक प्रमुख अजय बोढारे खरबी गावात, भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष डॉ नीलिमा घोटाळे ह्या मौदा मंडळ अंतर्गत येणाऱ्या चिरव्हा गावात, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा अमीन ह्या रणाळा गावात,जिल्हा युवा मोर्चा महामंत्री संकेत बावनकुळे भुगाव गावात,नरेश मोटघरे मौदा तालुक्यातील बाबदेव,निलेश बुचुंडे नागपूर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या खापरी गावात, मोहसीन पटेल भिलगाव,ऍड आशिष वंजारी नेरी,किशोर बेले कामठी तालुक्यातील नान्हा मांगली गावात मुक्काम करून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

त्याग आणि बलिदानाची मूर्ती म्हणजे मातोश्री रमाई आंबेडकर - वीरेंद्र मेश्राम

Wed Feb 7 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्वतःसाठी न जगता बाबासाहेबांना मोठे करण्यासाठी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजाच्या सेवेसाठी जीवन अर्पण करणाऱ्या महान विभूती मातोश्री रमाई त्यांचा सारखा बलिदान कुणीही करू शकत नाही म्हणून रमाई आंबेडकर ह्या त्याग आणि बलिदानाची मूर्ती आहे.त्यांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे विचार समाजातील प्रत्येक महिलांनी अंगीकारावे व जीवन समृद्ध करून घ्यावे असे मौलिक प्रतिपादन समता सैनिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com