भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्याची लेक शिंदे गटात प्रवेश करणार

मुंबई :- राज्याच्या राजकारणातील आताच्या घडीची मोठी बातमी… भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्याची लेक शिंदे गटात प्रवेश करणार आहे. तसंच त्यांना उमेदवारी देखील दिली जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील राजकीय समीकरणं बदलत आहेत. अनेक नेते पक्षांतर करत आहेत. अशातच माजी केंद्रीय मंत्र्यांची लेक आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिंदे गटाकडून संजना जाधव छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड विधानसभा निवडणुक लढवणार आहेत. शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत.

संजना जाधव या शिंदे गटात प्रवेश करणार

रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आजच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजना यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. संजना जाधव या शिंदे गटाकडून कन्नड विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. शिंदे गटाकडून संजना जाधव यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. आज मुंबईत संजना जाधव यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. त्यानंतर संजना जाधव यांची उमेदवारी जाहीर होईल आणि त्या कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतील.

कोण आहेत संजना जाधव?

संजना जाधव या भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या त्या विभक्त पत्नी आहेत. कन्नडच्या राजकारणात त्या सक्रीय सहभागी असतात. कन्नड तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भाजपकडून लढण्यासाठी संजना जाधव या प्रयत्न करत होत्या. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला आली. त्यामुळे संजना जाधव या शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांचा पत्ता कट होणार आहे.

कन्नडमध्ये विधानसभेची रणधुमाळी

कन्नड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराचं जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. अपक्ष उमेदवार मनोज पवार यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे. हजारो लोकांची गर्दी जमवत केला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनोज पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती. कन्नड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांना मनोज पवार आव्हान देणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिवाजी नगर जिमखानाच्या सिया देवधरची बीएफआय शिष्यवृत्तीसाठी “अ” श्रेणीतील शीर्ष २० खेळाडूंमध्ये निवड

Sun Oct 27 , 2024
नागपूर :- येथील शिवाजी नगर जिमखानाच्या सिया देवधरची बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) शिष्यवृत्तीसाठी महिलांच्या “अ” श्रेणीतील भारतातील शीर्ष २० खेळाडूंमध्ये निवड झाली आहे. या शिष्यवृत्तीत प्रत्येक महिन्याला उच्च श्रेणीतील खेळाडूंना ₹७५,००० ची आर्थिक मदत दिली जाईल. ज्यासाठी बीएफआयने वार्षिक ₹३.६ कोटींचा निधी राखून ठेवला आहे. महाराष्ट्रातून या श्रेणीत निवड झालेली सिया ही एकमेव खेळाडू आहे, आणि तिची निवड गेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com