– वीर शाहिदो का यह बलिदान याद रखेगा हिंदुस्तान
नागपूर :-भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सह-संयोजक व्हि एन रेड्डीच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) महाराष्ट्र राज्य, तथा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेरी माटी मेरा देश या अभियाना अंतर्गत नागपूर येथील 12 महान हुतात्म्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरची माती मातीच्या कलश मध्ये जमा केली आहे व ते मातीचे कलश नागपूर महानगर पालिका प्रशासक तथा आयुक्त अभिजीत चौधरी यांना सुपूर्द केली. ज्या लोकानी देशासाठी आपल्या प्राणांची आहुति दिली आहे, पण ते त्यांच्या आप्तस्वकीयांना सोडून कोणालाच माहिती नाही, अश्या महान क्रांतिकारकां बद्दल माहिती एकत्र करून त्यांना लोकांपर्यंत घेऊन येणे, जेणे करून त्या महान क्रांतिकारीं विषयी इतर लोकांना सुद्धां माहिती मिळेल आणि त्यांना, त्यांच्या कुटुंबियाना एक नवीन ओळख समाजात मिळेल आणि अश्या बलिदान करणाऱ्या बाबत माहिती पुढे आणण्याचा काम व्हि एन रेड्डी यांच्या मार्फत झाले. महानगरपालिका आयुक्त यांनी सुद्धा या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी विवेक मेंढी राष्ट्रीय अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, प्रिया चंदेल, विजय गिरडकर, संदेश कनोजे, साकेत मिश्रा, व भारतीय जनता युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.