मुंबई :- भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात क्रांतीदिनाचे औचित्य साधत पक्ष कार्यकर्त्यांनी बुधवारी देशसेवा आणि विकासासाठी समर्पित होण्याची ‘पंचप्रण’ शपथ घेतली. भाजपा मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांना शपथ दिली. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, आ. श्रीकांत भारतीय, आ. मनीषा चौधरी, आ. विद्या ठाकूर, आ.भारती लव्हेकर, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, सहप्रभारी सुमंत घैसास, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, सह-मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण,प्रवक्ते गणेश हाके, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भाजपातर्फे ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबवले जात आहे. त्याचा भाग म्हणून कार्यकर्त्यांनी ‘पंचप्रण’ शपथ घेतली. ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाच्या माध्यमातून गावागावातील माती गोळा करून दिल्ली येथे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली.