भाजपा दक्षिण भारतीय आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा

मुंबई :-भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेश संयोजक राजेश पिल्ले यांनी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. नवीन कार्यकारिणीत ६ सहसंयोजक, ९ विभाग संयोजक, १० विभाग सहसंयोजक, १ प्रदेश समन्वयक यांचा समावेश आहे. सहसंयोजक पदी रवी भवानी, अरविंद शेट्टी, रमेश नायर आदींची तर मराठवाडा विभाग संयोजकपदी सुनील चर्कापल्ली, ठाणे विभाग संयोजकपदी मल्लेशम कोनका, कोकण विभाग संयोजकपदी गणेश शेट्टी, पश्चिम महाराष्ट्र संयोजकपदी मनोज पिल्लई, उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी मनोज राघवन, विदर्भ विभाग संयोजकपदी अमित मुदलियार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महिला विभाग संयोजकपदी जयश्री विजयकुमार, व्यापारी विभाग संयोजकपदी चेतन सुवर्णा, सोशल मीडिया सेल संयोजकपदी गोपी मेनन यांची तर प्रदेश समन्वयक पदी श्रीधर मड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभाग सहसंयोजक पदी सुंदर पिल्ले, मोहन पिल्लई, दिलीप नायर, लिला गणेश, बालन नारायणन आदींची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आघाडीचे प्रदेश संयोजक राजेश पिल्ले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

SPECTACULAR ANNUAL DAY CELEBRATION AT DELHI PUBLIC SCHOOL MIHAN 

Tue Dec 19 , 2023
Nagpur :-Delhi Public School, MIHAN celebrated its 4th Annual Day for Grades IV-XI on 17th December 2023. The theme of the theatrical performance of the evening was SEVEN WHEELS OF INSIGHT- A SCHOLARS EXPLORATION beautifully showcased that Chakras are important elements in our spiritual path and understanding them will allow us to integrate our mind, body and spirit. The narrative […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com