भाजपा संघटनपर्व प्रदेश प्रभारीपदी आ. रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती

– सक्रिय सदस्यता अभियानाच्या प्रमुखपदी राजेश पांडे 

नागपूर :- भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व या उपक्रमाच्या प्रदेश प्रभारीपदी माजी मंत्री आ. रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली. त्याचबरोबर पक्षाच्या प्रदेश अनुशासन समिती च्या अध्यक्षपदी माजी आमदार प्रा अनिल सोले यांची तर प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाच्या प्रमुखपदी राजेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर केले आहे.

पक्षाच्या संघटनात्मक बांधणी साठी संघटन पर्व उपक्रम सुरु करण्यात आला असून त्याच्या नियोजनाची जबाबदारी चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 डिसेंबरपासून नागपूर येथून संघटन पर्वाची सुरुवात कऱण्यात आली आहे. प्रदेश अनुशासन समितीत छ.संभाजीनगरचे किशोर शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी आमदार अतुल शाह व योगेश गोगावले यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सक्रिय सदस्यता अभियानाचे सहप्रमुख म्हणून प्रवीण घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

WCL की टीम संवाद को निवारक सतर्कता तथा सतर्कता जागरूकता अभियान में अग्रणी भूमिका के लिए, मिला कोल इंडिया से प्रतिष्ठित सम्मान

Sun Dec 29 , 2024
नागपुर :- कोल इंडिया लिमिटेड द्वारा आयोजित तीन महीने के सतर्कता जागरूकता अभियान (VAW-2024) में उल्लेखनीय योगदान के लिए वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड की “टीम WCL संवाद” को प्रमुखता से सम्मानित किया गया । कोलकाता में आयोजित इस अभियान के समापन समारोह में निवारक सतर्कता को बढ़ावा देने और ईमानदारी की संस्कृति को बढ़ावा देने में टीम के अथक प्रयासों को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!