संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जातीवर आधारलेली विषमतावादी समाजव्यवस्था बदलण्यासाठी संत रविदास महाराजानी आपले जीवन खर्ची घातले.सामाजिक समता त्यांनी समाजात रुजविली.समतेसाठी सर्वजण नेहमी अग्रेसर राहा, अंधश्रद्धेला बळी पडू नका,मुलांना शिकवा,त्यांना प्रगतीच्या दिशेने न्या, सत्ता संपत्तीचा अभिमान बाळगू नका आणि माणूस म्हणून सर्वांशी माणसासारखे वागा ,सर्वांचा आदर करा कायमचं सुख याच गोष्टीत समावले आहे तसेच संत रविदास महाराजांचे विचार आत्मसात करा असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी जिल्हाधिकारी व राज्य सचिव महाराष्ट्र शासन किशोर गजभिये यांनी केले.तसेच हा कार्यक्रम निष्ठा व नेकींचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे सांगून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या आणि या पुढाकाराला तितकीच समर्थ साथ देणाऱ्या रविदास नगरचे समस्त समाज बंधू,महिला कार्यसहयोगी तसेच नवयुवक कार्यसहयोगी चे कौतुक केले.
रविदास नगर कामठीच्या समस्त समाज बंधू, महिला कार्यसहयोगी व नवयुवक कार्यसहयोगीच्या वतीने रविदास नगर येथिल रविदास मंदिर परिसरात आयोजित क्रांतिकारी संत शिरोमणी श्री रविदास महाराज जयंती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमा अंतर्गत रांगोळी स्पर्धा ,पूजा अर्चना आरती ,लहान बालक बालीकांचे नृत्य स्पर्धा तसेच समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाले .या समाज प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख अतिथी माजी जिल्हाधिकारी किशोर गजभिये यासह रविदास परिषद मध्यप्रदेश चे राष्ट्रीय अध्यक्ष रामकिशोर चव्हाण यांनी बोलताना सांगितले की सामाजीक एकता आणि संघटन काळाची गरज आहे त्या दृष्टीने सर्वांनी सदैव प्रयत्नशील असले पाहिजे अशी अपेक्षा प्रतिपादित केली .तसेच ऍड श्याम अहिरवार यांनी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने समाजातील विद्यार्थ्यांनी त्यांना सोयीचे व्हावे व विविध क्षेत्राचे ज्ञान मिळावे यासाठी वाचनालयाकडे वळण्याचे मार्गदर्शीत केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येतील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती.कार्यक्रमाचे मंच संचालन व आभार प्रदर्शन रविदास नगर चे अनिल कुरील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भवाणीशंकर कुरील,मनीष जैस्वाल,आनंद चौधरी, मुकेश जैस्वाल, जितेंद्र कुरील, रोहित बच्छराज, चंदू जैस्वाल, ऍड आशिष देशराज ,हिरा सिमले, भारत जैस्वाल, सुनील कुरील, भरत कुरील, संजय जैस्वाल,शोभालाल जैस्वाल, किशोर तांडेकर, सुरेश तांडेकर, राजा सोनेकर, अर्चना सोनेकर, सारीका कनोजे, नरेश मोहबे, भीमराज जगणे,हंसराज मोहबे, शंभू कनोजे ,शेख अफरोज,सचिन ठवकर, संजय बांगर आदींनी मोलाची भूमिका साकारली.