नागपूर :- औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील शहिदांना रविवारी ४ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. कामठी रोडवरील दहा नंबर पूल चौक इंदोरा येथील नामांतर शहीद स्मारकस्थळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.
याप्रसंगी अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सतीश सिरसवान, संघपाल मेश्राम, गोपाल शेंडे, ज्योती शेंद्रे, किशोर बेहाडे, शीतल नंदेश्वर, प्रियंका बागडे, मोहिनी रामटेके, मीना खोब्रागडे, राखी मानवटकर , आनंद अंबादे, प्रिती बहादुरे, शिला मासूरकर, रोशन भोसर, पिंकी पाटील, मेघा बावनगडे, वीरूका मोहिले, सुमन झोडापे, सीमा सहारे, रेखा गौरे, मेघा डोंगरे, साधना वाघमारे, सीमा पंडित, समता पंचबुधे, इंदिरा वाघचौरे, प्रवीण चौरे, रोहित शुक्ला, झोपडपट्टी मोर्चा उत्तर नागपूरचे अध्यक्ष केवलराम बागडे, नितेश बिसे, राजेश नंदेश्वर, आनंद अंबादे, अमित वानखेडे, अंकुश वासनिक आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदान नागपूरनेच दिले. ४ ऑगस्ट १९७८ ला नागपुरातील पाच भीमसैनिक पोलिसांच्या पाशवी गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासून हा दिवस प्रत्येक वर्षी नामांतर शहीद दिवस म्हणून पाळला जातो. आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगलेल्या बाबासाहेबांना विद्यापीठाचे नाव मिळावे यासाठी आपल्या प्राणाचे बलीदान देणा-या सर्व शहीद भीमवीरांना विनम्र अभिवादन करीत असल्याची भावना यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली. याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी वीर शहिदांना जयभीमची सलामी दिली.