नागपूर :- देशाचे दुरदर्शी नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रीमंडळाच्या शपथविधीसाठी नागपुरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी निमंत्रणानुरुप शनिवारी (ता.८) राजधानी दिल्लीसाठी रवाना झाले.
भारतीय जनता पार्टीचे विदर्भ संगठन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश उपाध्यक्षद्वय प्रा. संजय भेंडे व अॅड. धर्मपाल मेश्राम, विदर्भ कार्यालय मंत्री संजय फांजे, शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, आर्थिक प्रकोष्टचे संयोजक मिलींद कानडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी च्या या ऐतिहासिक सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि एनडीए ला देशातील जनतेने बहुमतासह कौल दिला आहे. देशातील जनतेने दाखविलेला विश्वास आणि प्रेमामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. १९६२ नंतर पहिल्यांदाच भारतीय राजकारणात ही सुवर्णाक्षरांनी नोंद होणारी घटना आहे. भाजपा आणि एनडीए च्या यशासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून निवडक पदाधिकाऱ्यांना शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले आहे. यात नागपुरातील पदाधिकाऱ्यांना देखील या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.