भाजपचं ठरलं… उद्या पहिली यादी जाहीर होणार; RSS कडून या नावांसाठी आग्रह

मुंबई :- उमेदवारांची नावे जाहीर करण्यात महायुती आघाडीवर आहे. महाविकास आघाडीची यादी लांबणीवर पडणार आहे. भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. महायुतीतल्या काही उमेदवारांना येत्या 48 तासात एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडीची पहिली यादी 20 तारखे नंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या बैठकांमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या उमेदवारांची याद्याही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याच आठवड्यात शिंदेंची शिवसेना आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. महाविकास आघाडीतील यादी मात्र पुढच्या आठवड्यातच जाहीर होणार आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी संघाकडूनही काही नावांची आग्रही मागणी आहे. एकाच मतदारसंघातून संघ आणि पक्षाकडून वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावांसाठी आग्रह आहे. महाराष्ट्रात भाजप पक्ष संघटनेकडून केंद्रीय नेतृत्वाकडे विविध नेत्यांच्या उमेदवारीसाठी यादी पाठवण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला संघ विचार परिवाराकडे काही इच्छुक उमेदवारांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे आता भाजपच्या यादीत हा समन्वय कसा साधला जाणार?, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचा प्रयत्न आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मंदार हळबे यांच्या नावासाठी आग्रह आहे. मुलुंडमध्ये मनोज कोटक यांच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आग्रह आहे. तर भाजप मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यासाठी इच्छुक आहे.

नवी मुंबईतून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात यावी, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटतं. तर संदीप नाईक यांच्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. ठाण्यातून विनय सहस्रबुद्धे यांनाच उमेदवारी देण्यात यावी, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह आहे. मात्र भाजप संजय केळकर यांना उमेदवारी देऊ इच्छित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारला अपघात, कार-ट्रॅव्हल बसमध्ये जोरदार धडक

Thu Oct 17 , 2024
सोलापूर :– राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा अपघात झाला आहे. धनंजय मुंडेंच्या पत्नीची कार आणि ट्रॅव्हल बस यांच्या भीषण धडक झाली. पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटे ही घटना घडली. कारने ट्रॅव्हल्सला पाठीमागून दिली धडक मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुणे सोलापूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com