यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती व अंत्योदय दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी कार्यालय अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील अभिवादन केले.