– विद्युत विभागाकडून मागण्या पूर्ण
भंडारा :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर उपोषण आंदोलन पुकारले होते. अखेर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देत सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन देत उपोषण सोडविले.
विद्युत वितरण विभागातर्फे वीज देयके थकीत असलेल्यांना बिल भरण्यात मुदत द्यावी, प्री-पेड मिटरसंबंधी पायाभूत सुविधा दिल्याशिवाय लावू नये, प्री-पेड मीटर लावण्यासंबंधी सक्ती करू न करता ऐच्छिक करावे तसेच शेतक-यांना 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांच्या पुर्ततेकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी 29 फेब्रुवारी पासून उपोषण पुकारले होते.
या उपोषणाला जिल्ह्यातील विविध संघटनांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शविला. यानंतर विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येऊन त्यांनी उपोषणस्थळी भेट देत मागण्यांबाबत चर्चा केली. अखेर आज 5 मार्च रोजी उपोषणकर्ते अजय मेश्राम यांच्या मागण्यांची वरिष्ठ स्तरावर दखल घेऊन मागण्या मान्य करण्यात आल्या. यावेळी महावितरण कंपनीचे वरिष्ठ अभियंता गिरी, जयस्वाल, भुसारी यांनी लिंबूपाणी पाजून उपोषण सोडविले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव दिलीप सोनुले, जिल्हा अध्यक्ष किरण अतकरी, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर भोपे, जिल्हा सचिव राजा खान, भंडारा शहर अध्यक्ष मधुकर चौधरी, सुखराम अतकरी, नरहरी वरकडे, कुणाल पवार श्याम कांबळे ईश्वर कळंबे, गौरव पडोळे, घनशाम वंजारी, राकेश हटवार, कृष्णा आगासे, चंद्रशेखर खोब्रागडे, जिल्हा महिला अध्यक्ष अनिता गजभिये, शहर अध्यक्ष शाहीना खान, नीलिमा रामटेके, रूपाली साखरकर, योगिता सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.