येरखेडा ग्रामपंचायत येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येरखेडा ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या अध्यक्षतेखाली व नागपूर वजिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकर्डे यांच्या हस्ते रविवार, १८ जून रोजी करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कुंदा राऊत, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रा. अवंतिका लेकुरवाळे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, कामठी पंचायत समिती सभापती दिशा चणकापुरे, उपसभापती दिलीप वंजारी,सुमेध रंगारीव कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये रस्ते बाधंकामाची मोठ्या प्रमाणात गरज असुन पावसाळ्यात गावातील नारिकांना होणारा त्रास या करीता पाठपुरावा करुण गरजु रस्त्याचे बाधंकाम गरजेचे असल्याने ग्रामपंचायत येरखेडा येथील रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. गावातील विविध विकास कामांकरिता पहिल्या टप्प्यात दीड कोटी रुपयांचे मंजूर झाली असून विविध विकास कामाकरीता ही रक्कम खर्च करुण गावाला विकासाच्या मार्गी लावण्याची गरज असल्याचे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी दिले. तर गावाचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकर्डे यांनी व्यक्त केले. प्रसंगी सरपंच सरिता रंगारी यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, त्यांच्या मागील कार्यकाळात येरखेड्यात सरपंच व जिल्हा परिषद सदस्य असताना बरीच विकासकामे झाली. गावातील दीड कोटी निधीच्या कामांचे आज माझ्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. दुसरीकडे विकासकामे झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना त्यांच्या त्रासातून दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर इतर पाहुण्यांनीही आपले विचार मांडले. याप्रसंगी बिबी कॉलोनी येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिकांचा व दहावी बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच मंदा महाले, ग्रामपंचायत सदस्य सतीश डहाट, अनिल पाटील, सय्यद गुरफान, इम्रान नईम, रोशनी भस्मे, अर्चना सोनेकर, गीता परतेकी, नाजीश परवीन, नरेश मोहबे, अनिल भोयर, कुलदीप पाटील, पायल तिरपुडे, ज्योती घडले, ग्रामविकास अधिकारी रामेश्वर मानेकर आदी उपस्थित होते. इतर ग्रामस्थांनी विशेष सहभाग घेतला. प्रास्ताविक येरखेडा सरपंच सरिता रंगारी संचालन प्रवीण भायदे व ग्रा. प. सचिव रामेश्वर मानेकर यांनी वरील कार्यक्रमास उपस्थित पाहुणे व ग्रामस्थांचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नोकरीचे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या मृतक आरोपीवर गुन्हा दाखल

Mon Jun 19 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी रहिवासी काही बेरोजगारांना शासकीय नोकरीचे आमिष देऊन एम्प्लॉयमेंट एज डिफेन्स सिविलीयन एम्प्लॉयमेंट अशा पदाकरिता बनावट अपॉइंटमेंट पत्र बनवून फसवणूक करणाऱ्या मृतक आरोपी विरुद्ध भादवी कलम 420,417,468 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतक आरोपीचे नाव विश्वजित कुमार धमगाये वय 26 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com