बेला :- आष्टा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जसापुर गावात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 5 लाख रुपये प्राकलनच्या सिमेंट रस्त्यास मंजुरी मिळाली असून त्याचे भूमिपूजन माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे हस्ते नुकतेच झाले. यावेळी जि. प. सदस्या वृंदा नागपुरे अध्यक्षस्थानी होत्या तर माजी उपसभापती व पं स. सदस्य संजय चिकटे, नागपूर जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष प्रकाश नागपुरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नागपूर तालुकाध्यक्ष ममता बारींगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष वसंतराव कांबळे ,आष्टाचे सरपंच नामदेव भोंगे, हरिचंद्र मसराम व अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य मोहन मून यांनी प्रास्ताविक भाषणातून गावातील इतर समस्या मांडल्या. जनार्दन सुरकार यांनी सूत्रसंचालन केले. भूमिपूजन सोहळ्यात माजी मंत्री बंग यांचे गावकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
जसापुर येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com