– चित्रपट वेबसीरीज प्रकल्पास कुठलाही निधी कमी पडू देणार नाही
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सहकार्य केलेले दादाजी केळूसकर, सुरबा नाना टिपणीस, राजर्षी शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकारांशी असलेला सहवास आणि त्यातून दिसून आलेला सोशल इंजिनियरींग या उपक्रमामधे दिसून येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भिमराव ते बाबासाहेब हा चित्रपट वेबसिरीज सुरु करण्यासाठी तात्काळ पत्र देणार असल्याचे अभिवचन ना. रामदास आठवले यांनी डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांना दिले. महत्वकांक्षी प्रकल्पाव्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील ज्या ज्या देशामध्ये जाऊन त्यांने उच्च शिक्षण घेतले त्यांच्या सहवासाच्या ठिकाणाचा शोध आणि बोध या प्रकल्पाव्दारे घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बार्टीच्या समता रॅलीस संबोधित केले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समता रॅली बार्टी प्रादेशिक कार्यालय नागपूर मार्फत दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी समाजिक न्याय विभाग ते दीक्षाभूमी पर्यंत करण्यात आले होते.
याप्रसंगी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी तथागत भगवान गौतम बुध्द, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना बार्टी संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बार्टी संस्थेच्या वतीने विविध योजना व उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून भिमराव ते बाबासाहेब हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. तसेच त्यांनी ना. रामदास आठवले यांचे पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले. बार्टीच्या समता रॅलीचे उद्घाटन केल्याबद्दल ना. आठवले यांचे आभार मानले.
यावेळी बार्टी संस्थेचे विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सुकेशिनी तेलगोटे, पुणे बार्टीच्या कार्यालय अधिक्षक डॉ. संध्या नारखेडे, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे, बार्टी नागपूरचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके, भन्तेगण, रिपाईचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर, दयाल भादूरे, राजन वाघमारे, प्रवीण मोरे, प्रकल्प अधिकारी तुषार सुर्यवंशी, शीतल गडलिंग, सुनीता झाडे, प्रकल्प समन्वयक नागेश वाहूरवाघ, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सरीता महाजन, रामदास लोखंडे, आकाश कुर्हाडे, मंगेश चहांदे यांच्यासह बार्टीच्या विविध योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी, प्रशिक्षक बार्टीतील अधिकारी व कर्मचारी, अनुयायी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सतीश सोमकुंवर बार्टीचे तर आभार प्रादेशिक कार्यालय बार्टी नागपूरचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके यांनी केले.