संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 26:- कामठी तालुक्यातील भिलगाव – खसाळा – म्हसाळा या तीन ग्रामपंचायतची संयुक्त पाणीपुरवठा योजनाचे कामे पूर्णत्वास येऊन वर्ष लोटून गेले असून सदर योजना ग्रामपंचयातला हस्तांतरित करण्यात आले नसून पाण्याच्या योग्य नियोजना अभावी ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून गावात पाण्याचा हाहाकार सूरु असल्याची स्थिती असल्याने भिलगाव म्हसाळा ग्रामपंचायत अंतर्गत टँकरने पाणीपुरवठा होत आहे तेव्हा नागरिकांची पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी ही स्वतंत्र पाणी पुरवठा योजना सदर ग्रा प ला हस्तांतरित करण्यात यावी अशी मागणी या तिन्ही गावातील सरपंच लोकप्रतिनिधी व गावकरी करीत आहेत.
कामठी तालुक्यातील भिलगाव खसाळा, म्हसांळा या तीनही ग्रामपंचयतच्या पाणी पुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे वतीने जलस्वराज्य पाणी पुरवठा योजने अंतर्गत 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता पाणीपुरवठा योजनेचे भूमीपुन दि, 21 मे 2017 ला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी ,माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने, तत्कालीन नागपूर जिल्हा परिषद चे अध्यक्ष निशा सावरकर यांचे हस्ते करण्यात आले होते या पाणीपुरवठा योजनेचा कंत्राट मुंबई येथील मुखर्जी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला असून या कन्स्ट्रक्शन कंपनीने त्याच वर्षी पाणी पुरवठा योजनेच्या बांधकामाला सुरुवात केली पाणी पुरवठा योजनेची इंटेक विहीर कन्हान नदी बिना घाटावर असून पानी पाईप लाईन द्वारे म्हसाळा ग्रामपंचयत अंतर्गत कवठा येथे जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरण झाल्यावर प्रत्येक ग्रामपांचयत अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणी टाकी द्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे .प्रत्येक ग्रामपंचयत अंतर्गत स्वतंत्र पाणी टाक्या त्या करण्या आल्या आहेत पाणी पुरवठा योजने अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचयत मधील गावातील प्रत्येक नागरिकाचे घरापर्यत पाणी पाईपलाईन टाकून नळ कनेक्शन लावून द्यायचे काम कंत्राटराला 31डिसेंम्बर 2018 पूर्ण करून देण्याचा करार योजनेत ठरवून देण्यात आला आहे .तिन्ही गावातील संयुक्त पाणी पुरवठा ग्रामपंचायत ला हस्तांतरित करण्यात आल्या नसल्यामुळे या तिन्ही ग्रामपंचयत अंतर्गत नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे भिलगाव, म्हसाळा ग्रामपंचात अंतर्गत पाणी समस्येसाठी ट्रॅकर ने पाणी पुरवठा करावा लागत आहे. तेव्हा ही स्वतंत्र पाणी पुरवठा योजना सदर तिन्ही ग्रा प ला हस्तांतरित करण्याची मागणी गावातील गावकऱ्यानी केली आहे.
भिलगाव – खसाळा – म्हसाळा च्या संयुक्त पाणीपुरवठा योजना चा कारभार ग्रामपंचयातला केव्हा हस्तांतरण होणार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com