संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपुर :- ऑल इंडिया.भिक्खु.संघ अंतर्गत महाराष्ट प्रदेश भीक्खु संघ प्रदेश स्तरीय अधिवेशन दींक्षाभूमी आडोटोरीयम नागपुर येथे भदंत सत्यशील महास्थविर अध्यक्ष बौद्ध प्रशिक्षण संस्थान यांचे हस्ते रितसर करण्यात आले भदंत धम्मसेवक महास्थविर अध्यक्ष महाराष्ट प्रदेश भीक्खु संघ यांचे अध्यक्षते खाली संपन्न होत असलेल्या अधिवेशनात दोन दिवस भीक्खुसंघा सबंधित विविध विषयावर चर्चा करण्यात येणार असुन सघ मजबूत करणे, विनयधर व वरिष्ठ भीक्खु चा सन्मान राखने विनयाविरूद्ध किवा संघाविरूद्ध धम्माविरूद्ध वर्तन करणार्या विरूद्ध कारवाही करण्यात यावी, शिस्तबंद्ध अनुशासन बंद्ध भीक्खु संघ निर्माण करुन वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात यावा ,प्रत्येक जिल्हास्तरिय भीक्खुसंघ शाखा स्थापीत करण्यात याव्यात, भीक्खुसंघावर समाजाकडून होणार्या आरोप प्रत्यारोप यावर सुद्धा विचार-विमर्श करण्यात येणार आहे.
उपरोक्त अधिवेशनाची भुमीका डाॅ भदंत उपगुप्त महास्थविर, प्रास्ताविक भदंत विनयरंख्खीत महास्थविर सचालन भदंत ज्ञानरंक्षित महास्थविर,या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित पुज्य भदंत डाॅ खेमधम्मो महास्थविर, भदंत बोधिपालो महास्थविर भदंत महापंथ महास्थविर भदंत संघानंद महास्थविर भदंत विशुद्धानंद महास्थविर, डाॅ भदंत ज्ञानदिप महास्थविर, भदंत सुमनवंन्नो महास्थविर भदंत प्रियदर्शी महास्थविर भदंत बुद्धघोष महास्थविर भदन्त डाॅ धम्मोदय महास्थविर भदंत डाॅ धम्मसेवक महास्थविर, भदंत शिलानंद महास्थविर भदंत ज्ञानबोधी महास्थविर भदंत सत्यानंद महास्थविर भदंत संघधातु महास्थविर, समन्वयक भदंत नाग दिपंकर महास्थविर सह मोठ्यासंख्येने महाराष्ट्रातील विविध भागांमधून भीक्खुसंघ उपस्थित आहेत.