भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्राची कार्यकारिणी घोषित, नागपुरातील अनेकांना संधी!

– दिनेश दमाहे ,मुख्य संपादक 

नागपूर – देशाचे लाडके व कणखर पंतप्रधान नरेंद्रमोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा भाजपा महामंत्री विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्रच्या कार्यकारणी घोषित करण्यात आली.

या कार्यकारिणीमध्ये नागपुर शहरातुन प्रदेश महामंत्री पदी सलग दुसऱ्यांदा शिवानी दाणी वखरे यांची निवड करण्यात आली.

भाजयुमो शहर अध्यक्ष म्हणुन जवाबदारी यशस्वीपणे सांभाळणारे पारेंन्द्र (विक्की) पटले यांना प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली.

प्रदेश सचिव म्हणुन जवाबदारी सांभाळणारे कल्याण देशपांडे यांना बढती देत प्रदेश उपाध्याक्ष म्हणुन जावबदारी देण्यात आली.

भाजयुमो शहर महामंत्री दिपांशु लिंगायत यांना प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य देवदत्त (देवा) डेहणकर यांना देखील प्रदेश सचिव पदाची जवाबदारी देण्यात आली.

प्रदेश सदस्य पदी रितेश राहाटे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली.

तसेच भाजयुमो शहर उपाध्यक्ष असलेले व्हि. एन. रेड्डी यांना अल्पकाळात मोठी जवाबदारी देत भाजयुमो प्रदेश सोशल मिडीया सह-संयोजक पदी निवड करण्यात आली.

सर्वांनी त्यांच्या नियुक्ती बद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानले व भविष्यात पक्षानी दिलेले काम संपुर्ण ताकदीने करण्याची ग्वाही दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जीवनाचा आधार म्हणजे डॉक्टर - डॉ संजय माने

Fri Aug 4 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आपला दवाखाना हे लोकांच्या उपचारासाठी कार्यरत असून याचा फायदा हा शेतमजूर,शेतकरी व आजारी रुग्ण ते बाळंतपण होणाऱ्या महिलेपर्यंत पोहोचत असते .मनुष्य आजारी पडतो, त्याला जगण्याची इच्छा असते अशावेळी रुग्णांना डॉक्टरच जगवू शकतो त्यामुळे जीवनाचा आधार म्हणजे डॉक्टर असल्याचे मत माजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!