भरतभाऊ माळी, उदयशंकर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई :-तळोदा ( जि. नंदूरबार ) येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी नगराध्यक्ष भरतभाऊ माळी, सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उदयशंकर पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील, साक्री ( जि. धुळे ) च्या माजी पंचायत समिती सभापती कविता पाटील यांच्यासह विविध पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला कामगार मंत्री सुरेश खाडे, आ. अमरिशभाई पटेल, आ. सुभाषबापू देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, सोलापूर जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विजय चौधरी, विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा जगात उंचावली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व समाजघटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प मांडून जनकल्याणकारी सरकार कसे असते हे दाखवून दिले आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे देशाचे, राज्याचे भले होईल अशी खात्री वाटू लागल्यानेच अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी, नेते, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत. या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सोलापूरच्या दादाश्री प्रतिष्ठानचे गिरीश किवडे, उद्योजक रोहन रमेशदादा पाटील, सोमनाथ पाटील , तळोद्याच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण माळी, अनिल मगरे, माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, पंकज राणे, घोडदे ( ता. साक्री ) च्या माजी सरपंच अंजाबाई पवार, उपसरपंच जयश्री क्षीरसागर, मोहन अनगर, मराठा महासंघाचे विलास देसाई , मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गणेश काटकर, शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष राजन घाग, विवेक सावंत, उद्धव ठाकरे गटाच्या शेतकरी सेनेचे विश्वास सावंत, दादासाहेब येडे पाटील, संतोष चौधरी आदींचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

Tue Mar 21 , 2023
मुंबई :- पुणे जिल्ह्यातील हायब्रीड अॅन्युईटी कार्यक्रमांतर्गत पीएन-२४ आणि पीएन-२५ या रस्त्यांच्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे ठेकेदार संथ गतीने करीत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी करीत आहेत. प्रलंबित रस्त्यांच्या कामाला गती देऊन मे महिन्याच्या अगोदर सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये सुधारणा करण्याबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!