अपघातात मृत्युमुखी नागरिकांसाठी जागतिक स्मरण दिवस पारिवहन विभागाकडून रॅली व वार्कर स्ट्रीटला कार्यक्रम

नागपूर :- जागतिक स्तरावर दरवर्षी नोव्हेंबर महिन्याचा तिसरा रविवार हा रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या नागरिकांचा स्मरणार्थ रस्ता वाहतूक मृत्यूमुखी पडलेल्यांचा स्मृतिदिवस म्हणून जागतिक स्तरावर घोषित करण्यात आलेला आहे. यानिमित्त आज रविवार २० नोव्हेंबर रोजी रस्ता सुरक्षा विषयक जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन परिवहन विभागातर्फे करण्यात आले.   नागपूर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयापासून आज सकाळी या संदर्भात एक जनजागृती रॅली काढण्यात आली. परिवहन विभागाचे कार्यालय ते बर्डी, शंकर नगर, धरमपेठ, पुन्हा आरटीओ कार्यालय अशी ही रॅली होती. तर सायंकाळी वॉकर स्ट्रीट येते एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याचे रस्ते परिवहन नियंत्रक अधिकारी रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात आरटीओ कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. नियमांचे पालन न केल्यामुळे अनेक अपघात घडतात.यामध्ये आपल्या जिवलगांचा नाहक बळी जातो. त्यामुळे नियमांचे पालन करण्याचे आवाहन, तसेच रस्ते अपघातातील जखमींना तातडीने मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर नागपूर ( ग्रामीण ) मधील 110 अपघातातील 22 मृत्यूमुखी पडलेल्या तसेच 344 जखमी झालेल्या तर नागपूर शहरातील 107 अपघातील 35 मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या 181 नागरिकांची नोंद घेत रस्ता सुरक्षा विषयक जनतागृतीपर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा विषयक काम करणाऱ्या सर्व शासकीय विभागांचा (पोलीस, सा.बां.वि.आरोग्य शिक्षण, जिल्हा परिषद, नगर परिषद,महानगरपालिका आदी), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्थानिक परिवहन महामंडळ, स्थानिक महानगरपालिका परिवहन उपक्रम, खाजगी, स्वयंसेवी संस्था (NGO), स्थानिक वाहतूक संघटना, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, पी. यू.सी. सेंटर डिलर्स, रेट्रो फिटर (Retro Fitter) तसेच रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांचे कुटुंबीय यावेळी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमास सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व सर्व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागरिक यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिंदू मुलींचे जीवन उध्वस्त करणारा ‘लव जिहाद’ रोखण्यासाठी तत्काळ ‘लव जिहाद विरोधी कायदा’ लागू करा ! – नमिता काकडे , रणरागिणी शाखा

Mon Nov 21 , 2022
नागपूर : – येथील संविधान चौक येथे हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात त्या बोलत होत्या. मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावाला उत्तर प्रदेशातील लखनऊ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!