नागपूर :- कौशल्यायन नगर येथील कल्पतरू बुद्ध विहाराचे संचालक व अखिल भारतीय भिक्खु संघाचे विदर्भ प्रमुख भन्ते प्रियदर्शी महाथेरो यांची स्कुटी स्लिप झाल्याने अपघात झाला. भन्तेजी ह्यांच्या छातीला मुकामार लागला आहे. त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल) च्या वार्ड क्रमांक 11 मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
त्यांच्या प्रकृतिची चौकशी करण्यासाठी आज भन्ते डॉ. धमोदय, भन्ते संघरत्न, भन्ते नंदबोधी, भन्ते जीवन ज्योती, भन्ते तिस्स, भन्ते धम्मधर, भन्ते विनयकीर्ती, भन्ते संघानंद, सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेवडे, शामराव तिरपुडे आदींनी प्रत्यक्ष मेडिकल ला जाऊन भेट घेतली.
भन्तेजी ह्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आराम करण्याची गरज आहे. त्यांची विशेष काळजी मेडिकल ची डॉक्टर मंडळी घेत आहे. -उत्तम शेवडे, बसपा