नागपूर :- पवित्र दिक्षाभूमी येथुन बौध्द धम्माचा प्रचार प्रसारचे कार्य होणे अपेक्षित आहे व बुध्दाचा वैज्ञानिक धम्म दिक्षाभूमीहून संपूर्ण जगात पसरावा असे डॉ. बाबासाहेबाचे स्वप्न होते परंतु तसे होतांना दिसून येत नाही. याला कारणीभूत दिक्षाभूमी स्मारक समितिचे अध्यक्ष भन्ते आर्य नागार्जुन सुरेई ससाई आहेत. त्यांच्या आरचरणामुळे बौध्द समाजात चुकीचा संदेश जातो बौध्द धम्मात अंधश्रध्देला थारा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी ज्या दिक्षाभुमीवर लाखो लोकांना बाबीस प्रतिज्ञा देऊन बौध्द धम्माची दिक्षा दिली त्या दिक्षाभुमीचे अध्यक्ष हे अंधश्रध्देला थारा देत वित्तुबाबाबसमोर नतमस्तक होतात व याचा विडियों त्यांचे शिष्य प्रसारित करतात. ज्यामुळे बौध्द जमाजात गैरसमज निर्माण होतो असा आरोप भन्ते आनंद महाथेरो यांचा आहे.
भारतातले भन्तेगण दिक्षाभुमीवर बौध्द संगती व बौध्द धम्माशी संबंधीत कार्यक्रमाकरिता अध्यक्षाकडे परवानगी मागतात पण अध्यक्ष त्यांच्या शिष्याशिवाय किंवा त्यांच्या मर्जीतल्या लोकाशिवाय इतर कोणालाही तेथे परवानगी देत नाही.
भन्ते आनंद महाथेरो म्हणाले की बुध्दगयातील महाबोधी महाविहार हे बौध्दांच्या ताब्यात मिळावे म्हणून वर्ष १९९२ पासून बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन भन्ते आर्ज नागार्जुन सुरेई ससाई सोबत अखिल भारतीय भिख्खु महासंघ व अखिल भारतीय धम्मसेनाच्या माध्यमातुन भारतातील जनतेच्या सहकार्याने सुरू केले परंतु ससाई यांनी भाजपा च्या काळात सरकारने यांना राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगचे बौध्द प्रतिनिधी सदस्यपद बहाल करताच यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनला पूर्णविराम दिला. मी भन्ते आनंद व अन्य भन्तेगणानी त्यांना आंदोलन करिता देश विदेशातुन आलेले धन व त्या माध्यमातुन घेतलेली वाहने मांगितली असता काहीच मदत केली नाही व स्वतः नागपुर जिल्हयात मोठ्यामोठ्या शेतजमीन विकत घेतल्या राजकुमार वंजारी यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली की बौध्द समाजाची खासकरून बौध्द उपासीकांची अनेक वर्षापासुन मागणी आहे की पवित्र दिक्षाभुमीवर माई रमाआई चा पुतळा बसविण्यात यावा. या करिता आम्ही अध्यक्ष व समितीकडे मागणी केली परंतु अध्यक्षांनी आतापर्यत आमची मागणी मान्य केली नाही आणि दिक्षाभुमी वर अगोदरच भगवान बुध्दाच्या पाच मुर्त्या बसविलेल्या असता पुनःच स्वतःह थायलेडला जाऊन भगवान बुध्दाची मुर्ती आणली व ती दिक्षाभुमीवर बसवण्याच्या प्रयत्नात आहेत.
भन्ते आनंद महाथेरा म्हणाले की बौध्द धम्मात अंधश्रध्देला थारा नाही. बौध्द धर्म हा वैज्ञानिक धम्म आहे. पवित्र दिक्षाभुमी हे बौध्दांचे उर्जाक्षेत्र आहे. येथुन बौध्द धम्म प्रचार प्रसार व्हावयास पाहिजे परंतु दिक्षाभुमीच्या अध्यक्ष बौध्द धर्माचा प्रचार प्रसार रोखणारा आहे व अंधश्रध्देला थारा देणार आहे. अशाच या अध्यक्षाने स्मारक समिती चे अध्यक्षपद सोडावे.
वरिल व्यक्तव्य भन्ते आनंद महाथेरो आग्रा यांनी टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्र परिषेद केले. या प्रसंगी भन्ते प्रज्ञानंद राजकुमार वंजारी, भन्ते आर्यान, भन्ते येतानंद इत्यादी उपस्थित होते.